Horticulture

पिकांच्या वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्यांसोबत काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. परंतु सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना योग्य पद्धतीने पिकाना करणे खूप गरजेचे असते. खते देण्यासाठी शेतकरी बंधू वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करतात. परंतु यामध्ये विद्राव्य खते देण्यासाठी फर्टिगेशन आणि पिकांवर विद्राव्य खतांची फवारणी हे दोन पर्याय खूप महत्त्वपूर्ण ठरतात. त्या अनुषंगाने या लेखामध्ये आपण विद्राव्य खते देताना जर फर्टिगेशन आणि फवारणीचा वापर केला तर काय फायदे होतात? याबद्दल माहिती घेऊ.

Updated on 21 October, 2022 4:16 PM IST

पिकांच्या वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्यांसोबत काही सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्‍यकता असते. परंतु सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करताना योग्य पद्धतीने पिकाना करणे खूप गरजेचे असते. खते देण्यासाठी शेतकरी बंधू वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करतात. परंतु यामध्ये विद्राव्य खते देण्यासाठी फर्टिगेशन आणि पिकांवर विद्राव्य खतांची फवारणी हे दोन पर्याय खूप महत्त्वपूर्ण ठरतात. त्या अनुषंगाने या लेखामध्ये आपण विद्राव्य खते देताना जर फर्टिगेशन आणि फवारणीचा वापर केला तर काय फायदे होतात? याबद्दल माहिती घेऊ.

विद्राव्य खतांसाठी फवारणीचा वापर आणि फायदे

1- पाण्यामध्ये विद्राव्य खतांचा वापर फवारणीसाठी देखील करता येतो. जर आपण एकंदरीत पिकांच्या उत्पादन क्षमतेचा विचार केला तर पानामध्ये असलेले जी काही अन्नद्रव्यांची पातळी आहे

त्यावर पिकाची उत्पादनक्षमता ठरते. त्यासाठी पिकाच्या पानांमधील अन्नद्रव्यांची पातळी संतुलित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारी महत्त्वाचे अन्नद्रव्य संतुलित प्रमाणात पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये गरजेनुसार मिळणे गरजेचे आहे.

2-जर शिफारशीत मात्रेत फवारणी केली तर पिकांची जोमदार वाढ होते तसेच फळांचे वजन,फळांचा आकार तसेच फळांची प्रत चांगली सुधारते व साठवणूकीसाठी चांगले तसेच निर्यातक्षम उत्पादन हातात येते.

3- फवारणीतून जर पिकांना विद्राव्य खते दिली तर ती त्यांना उद्युक्त करून त्यांचे उत्पादन प्रक्रिया वाढवण्यासाठी व वाढीच्या निरनिराळ्या अवस्थेत फवारणी केल्यास उत्पादनात वाढ होते.

4- दुसरे महत्त्वाचे म्हणजे बऱ्याचदा जास्त पाऊस पडल्यामुळे जमिनीतील खते वाहून जातात किंवा जास्त पाणी साचल्यामुळे पिकाची मुळे कार्यरत होत नाहीत. अशावेळी थोडा जरी पाऊस थांबला तरी फवारणी मधून खताचा पुरवठा पिकांना पटकन करता येतो.

5- बरेचदा जमिनीमध्ये पाण्याची कमतरता म्हणजे ओलावा कमी असतो  किंवा उन्हाळाच्या परिस्थितीमध्ये संध्याकाळच्या वेळेस जर फवारणीच्या माध्यमातून विद्राव्यखते फवारली तर पाने टवटवीत होऊन कार्यरत राहतात व अवर्षण स्थितीत देखील टिकाव धरू शकतात.

नक्की वाचा:धक्कादायक! बनावट खतांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकावर गुन्हा दाखल

 फर्टिगेशन एक महत्त्वाचा पर्याय

 पिकांना पाण्यामधून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य खते देण्यास फर्टिगेशन असे म्हणतात.जर आपण फर्टिगेशनचे फायदे पाहिले तर….

1- पिकांना गरज असलेली योग्य ती अन्नद्रव्य ठराविक कालावधीत योग्य वेळेत देता येणे शक्य होते.

2- जर आपण विद्राव्य द्रवरूप खतांचा विचार केला तर ते आम्लधर्मीय असून क्षारभार कमी असणारी, सोडियम क्लोराइडमुक्त असल्याने जमिनीच्या पाण्याचा व खतांचा कार्यक्षमतेने वापर झाल्याने जमिनीची सुपीकता टिकण्यास मदत होते व पिकांच्या उत्पादनात वाढ होते.

3- ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जर विद्राव्य खतांचा पुरवठा केला तर पिकांच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात ते जातात व त्यांचे शोषण व्यवस्थित होते.

4- फर्टिगेशनच्या माध्यमातून विद्राव्य खते दिल्याने पिकाची वाढ जोमदार होते तसेच पिके विविध रोगांना बळी पडत नाही. त्यामुळे बुरशीनाशक वा वरील खर्च कमी होतो.

5- पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार खते देता येणे शक्य होते व खतांची कार्यक्षमता वाढते त्यामुळे पिकाचे उत्पादन वाढते.

6- तसेच खते विभागून जमीन तसेच पिकाच्या व हवामानातील बदलानुसार देता येतात.

नक्की वाचा:New Soyabean Veriety: आता नाही होणार सोयाबीन वर जास्त प्रमाणात रोगांचा प्रादुर्भाव, सोयाबीनच्या नवीन जाती विकसित

English Summary: fertigation and sprey on crop is so important method to provide water soluble fertilizer to crop
Published on: 21 October 2022, 04:16 IST