आपण शेतीमध्ये विविध प्रकारची पिके लावतो सोबत मोठ्याप्रमाणात फळबाग देखील लावले जात आहे. परंतु कुठलीही पीक घेताना किंवा फळबाग लागवड करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला हा कधीही फायद्याचा ठरतो.
त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जर फळबागेचे असो वा पिके त्यांचे नियोजन केले तर उत्पादनात वाढ हमखास होते. कारण आपल्याला माहित आहेस की तज्ञ म्हटले म्हणजे त्या त्या क्षेत्रात त्यांच्या ज्ञान अफाट असते व त्यांच्या ज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन मिळवणे शक्य होते. अशाच प्रकारे आपण या लेखांमध्ये पपई लागवडीचे माध्यमातून भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी कृषी तज्ञांनी दिलेल्या काही टिप्स अभ्यासू.
पपई लागवडीच्या माध्यमातून भरघोस उत्पादनासाठी टिप्स
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिंगणी बुद्रुक येथील फळबाग शेतीला अकोला जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. खोत यांनी नुकतीच भेट देऊन शेतकऱ्यांना काही अनमोल मार्गदर्शन केले.
. यावेळी त्यांनीपपई उत्पादक शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन केल्यास लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते असे मत व्यक्त केले. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की,पपई लागवड यासाठी जमिनीची निवड करताना ती सुपीक, माध्यम आणि काळी रेती मिश्रित पोयटा जमीन योग्य ठरते. जमीन काळी असली परंतु ती पाण्याचा योग्य निचरा होणारी आवश्यक असते. तसेच पपईच्या झाडाच्या मुख्य खोडाच्या सभोवती कायम पाणी जमा होऊ नये. जर जमीन मध्यम व रीती मिश्रित पोयटा गिफ्ट असेल तर पाणी साठवण्याची पात्रता वाढवण्यासाठी अशा जमिनीत योग्य सेंद्रिय खतांचा वापर करणे खूपच गरजेचे आहे. याबाबतीत तापमाना बद्दल त्यांनी सांगितले की, पपई या पिकाचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी तापमान सरासरी 15 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान असणे आवश्यक ठरते. जर पपई फळ पिकाला मानवणाऱ्या तापमानाचा विचार केला तर कमाल 44 अंश सेंटिग्रेड तर किमान दहा अंश सेंटिग्रेडपर्यंत सहनशील असते.
तसे पाहायला गेले तर पपई हे पीक उष्ण कटिबंधात वाढणारे पीक आहे.पपई लागवड करण्यासाठी रोपांची निर्मिती बीच्यामार्फत केली जाते. जर आपण एक हेक्टर क्षेत्राचा विचार केला तर लागवड करण्यासाठी 250 ते 300 ग्रॅम बियाणे पासून रोपवाटिका तयार करणे गरजेचे असते. जर द्विलिंगी पपईचे जात असेल तर जास्त बियाण्याची आवश्यकता असते व जात उभयलिंगी असेल तर कमी बियाण्यांचे आवश्यकता असते. द्विलिंगी जातीच्या झाडांमध्ये 50 टक्के नर झाडांची गरज असते. अशावेळी फुलोरा अवस्थेमध्ये असताना अतिरिक्त नराचे झाडे उपटून टाकावेत. म्हणून अशा ठिकाणी दोन ते तीन रोपांची लागवड करण्यात येते. असे अकोला जिल्हा अधीक्षक डॉ. खोत यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
पपई लागवडीचा हंगाम
पपईची लागवड ही वर्षभर करता येते. परंतु प्रामुख्याने जून, जुलै आणि सप्टेंबर, ऑक्टोबर आणि जानेवारी ते फेब्रुवारी या तीन हंगामात करतात.
महाराष्ट्रामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत लागवड केली जाते. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले की पारंपरिक पिकांपेक्षा शेतकऱ्यांनी फळबाग लावावेत व उत्पन्न वाढवावे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:ऊस उत्पादनवाढीत मेन फॅक्टर आहे गंधक; ठरेल ऊस उत्पादन वाढीतील महत्त्वाचा घटक
Published on: 25 April 2022, 03:04 IST