महाराष्ट्रामध्ये तसेच इतर राज्यामध्येदेखील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू आहे. अशा परिस्तिथीमध्ये शेवगा लागवड फायदेशीर ठरते. कारण, शेवगा पिकासाठी ठराविक प्रकारचीच जमीनच असावा अस काही नाही, हलक्या जमिनीत देखील शेवगा पिकाची लागवड करणे शक्य आहे शेवगा पिकासाठी पाण्याची गरज देखील इतर पिकांच्या तुलनेने कमी आहे.
शेवगा लागवडी संबधी:
शेवगा लागवडीसाठी जुन-जुलै महिन्यामधील पहिल्या पावसानंतरचा काळ अनुकूल असतो कारण, या वेळी हवेतील आर्द्रता वाढते. जेणेकरून उन्हाची तीव्रता देखील कमी असते. अशा वेळी रोपांची लागवड केल्यास रोपे उगवण्यास अनुकूल वेळ असते.
शेवगा लागवड करण्यासाठी पाऊस पडण्याच्या अगोदर दोन फुट लांब, रुंद आणि खोल खड्डे खोदावेत व रोपे लावावीत. शेवग्याची रोपे जर बियांपासून अभिवृद्धी केलेले असतील तर मातृवृक्षातील अनुवांशिक गुण (True to Type) झाडे मिळत नाहीत तसेच फळ धारणा देखील शाखीय पद्धतीने केलेल्या अभिवृद्धीपेक्षा 3-4 महिना उशीरा होते.शाखीय पद्धतीने म्हणजे फाटे कलम वापरून अभिवृद्धी केल्यास झाडाला शेंगा लवकर लागतात. कटिंग्स (फाटेकलम) लागवड करण्यासाठी पेन्सील आकराच्या जाडीची तसेच 1-15 मी. लांबची फांदी/काडी वापरावी.
हेही वाचा:आरोग्यदायी व पौष्टिक शेवगा
खत व्यस्थापन:
शेवगा पिक वेगाने वाढणारे पिक आहे. म्हणून, पावसाच्या सुरुवातीला किंवा पावसाळ्यात प्रत्येक झाडाला 10 कि. कंपोस्ट/शेणखत, 75 ग्रॅम नत्र (165 ग्रॅम युरिया) 50 ग्रॅम स्फुरद (108 ग्रॅम डी.ए.पी.) व 75 ग्रॅम पालाश (120 ग्रॅम एम.ओ.पी.) द्यावे.
वाढ व्यवस्थापन:
शेवगा हे वेगाने वाढणारे झाड आहे. शेवगा पिकाच्या शेंगा तोडणीसाठी झाडाची वाढ व्यवस्थापण खूप महत्त्वाचे असते, अन्यथा झाड उंच वाढते पर्यायी शेंगा तोडणी अवघड बनते. वाढ व्यवस्थापनासाठी शेवगा लागवडी नंतर चार-पाच महिन्यांनी पहिली छाटणी करावी. त्यासाठी खोड जमिनीपासून 3-3.5 फुटांवर छाटावे आणि चार पाच फांद्या चोहो बाजुनीन वाटू घ्याव्यात. नंतर 7-8 महिन्यांनी चार पाच ठेवलेल्या फांद्या मुख्य खोडापासून 1 मी. अंतरावर कट कराव्यात. यामुळे शेवगा वाढ नियंत्रण केल्यास शेंगा तोडणीसाठी सोपे होईल. दर दोन वर्षांनी शेंगांची तोडणी झाली कि, छाटणी करावी म्हणजे झाड नियमित उत्पादन देईल.
शेवगा लागवडीसाठी विविध वाण:
शेवगा लागवडीसाठी कोईम्बतूर-1, कोईम्बतूर-2, पी.के एम-1 तसेच पी.के.एम-2 तसेच भाग्या, कोकण रुचिरा या जातीची निवड करावी.
काढणी व उत्पादन:
शेवग्याची लागवड केल्यापासून 6 महिन्यानंतर शेंगा लागतात. शेवगा शेंग रसरशीत असतानाच तोडणी करावी खूप टणक झाल्यास शेंगाची चव कमी होते. प्रत्येकी झाडापासून वर्षाला 50 किलो पर्यंत शेंगा मिळतात.
डॉ. साबळे पी. ए
(शास्त्रज्ञ, उद्यानविद्या, कृषी विज्ञान केंद्र, खेडब्रम्हा, साबरकंथा, गुजरात)
8408035772
डॉ. सुषमा सोनपुरे
(आचार्य पदवी विद्यार्थिनी, कृषिविद्या विभाग, म. फु. कृ. वि. राहुरी)
Published on: 29 September 2018, 02:07 IST