लालसर आकर्षक रंगाबरोबर आरोग्यासाठी चे फायदे लक्षात घेता लिची फळाची मागणी वाढत आहे. लिचीची लागवड डहाणू भागात होत असून, नवीन लागवड करण्याविषयी मागणी घेऊ
लिचीचे शास्त्रीय नाव लिची चायनेन्सीस असे असून, मूळस्थान चिन आहे. सतराव्या शतकात हे फळझाड भारतात आले. जागतिक पातळीवर प्रमुख उत्पादक देशांमध्ये भारत आणि चीन आघाडीवर आहेत. भारतामध्ये बिहार राज्यात लिचीची लागवड सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात लिची लागवड प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आढळते. घोलवड येथील दारबशा कावसजी पटेल या शेतकऱ्याने 1926 च्या सुमारास कोलकत्याहून लीचीची कलमे आणून प्रायोगिक लागवड केली होती. लीची हे सदाहरित प्रकाराचे झाड असून, वर्षभर नवीन वाढीसह फांद्या येतात.
नक्की वाचा:Onion: डाळिंबरत्न बी.टी गोरेंचा राडा!! एकरात 25 टन कांद्याचे उत्पादन
झाडाची उंची 10 ते 12 मीटर व विस्तार 8 मीटर असतो. लिची फळाचे पोषणमूल्य: लिची फळात 76 ते 87 टक्के पाणी, साखर 7 ते 12 टक्के, प्रथिने 0.7 टक्के, स्निग्धांश 0.3 ते 0.5 टक्के व खनिजे 0.7 टक्के असतात. लिची फळामध्ये उष्मांक 65 कॅलरी असून, जीवनसत्व 'क' हे 64 मि.ग्रॅ. प्रति 100 ग्रॅम आहे.
- हवामान व जमीन:- हिवाळ्यात थंड व उन्हाळ्यात उष्ण तापमान तसेच हवेतील आर्द्रता असलेले हवामान लिचीला मानवते. लिची लागवडीच्या प्रदेशात सर्वसाधारण जानेवारी महिन्यात तापमान कमाल 19 आणि किमान 9 अंश सेल्सिअस असते.जुलै महिन्यात तापमान कमाल 33 आणि किमान 25 अंश सेल्सिअस असते. झाडाला मोहर येतेवेळी जानेवारी महिन्यात सतत पाच-सहा दिवस दहा अंश से. ग्रे. च्या आसपास तापमान असावे.वार्षिक पर्जन्यमान 1200 ते1700 मिमी असावे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण जूनमध्ये सर्वसाधारण 80 टक्के आणि जानेवारीत 60 टक्के असावे. वालुकामय व निचरा होणारी तसेच जलधारणशक्ती अधिक असलेल्या जमिनीत लीचीची लागवड यशस्वी होते. जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 असावा. जास्त सामू असलेली जमीन लिची ला चालत नाही.
- जाती :- लिचीच्या आवश्यक गुणधर्म असलेल्या जाती निर्मितीसाठी फारसे संशोधन झालेले नाही. हवामान आणि जमीन नुसार रोपांमध्ये निरनिराळे गुणधर्म असलेल्या 8 ते 10 जाती आपल्याकडे प्रचलित आहेत.
1) घोलवड लीची :- यामध्ये अर्ली व लेट अशा दोन जाती आहेत.
1) अर्ली जात:- हे गुलाबी छटा असलेली हिरव्या रंगाची गोल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तयार होतात. झाडाची उंची 10 मी. विस्तार 8 मी. एका झाडाचे उत्पादन 80 ते 90 किलो
2) लेट जात:- फळे हृदयाकृती, गर्द लालसर रंगाची असून, मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात तयार होतात. बी लहान, गराचे प्रमाण जास्त व गोड, फळाच्या झुपक्यात 35 ते 40 फळे उत्पन्न अर्ली पेक्षा जास्त, परंतु पावसात सापडल्यास नुकसान एका झाडाचे उत्पादन 115 किलो.
नक्की वाचा:सुरवातीला 15 लाखांचे नुकसान; मात्र, आज कमवतोय वर्षाला 40 लाख
अभिवृद्धी:
पूर्वी बियापासून अभिवृद्धी केली जाई. मात्र अशा झाडाला फळे उशिरा म्हणजे पंधरा वर्षानंतर येतात. त्यामुळे आता गुटी कलमापासून लीचीची अभिवृद्धी करतात. अशा रोपांपासून 7 ते 8 वर्षात उत्पादन सुरू होते. गुटी कलमासाठी पावसाळा सुरू झाल्यावर जूनच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा जुलैमध्ये गुटी कलम बांधतात.याशिवाय लीची मध्येदाब कलम पद्धतही वापरतात.(source-agrowone)
Published on: 19 April 2022, 08:41 IST