आपल्या आरोग्यावर अनेक छोट्या मोठ्या गोष्टी परिमाण करत असतात. काहींमुळे आपल्याला फायदा होतो तर काहींमुळे तोटा देखील होतो. असे असताना आता आरोग्याच्या दृष्टीने हिरवी वेलची खूप फायदेशीर आहे. दुधात भरपूर कॅल्शियम असते, तर वेलचीमध्येही कॅल्शियम असते. यामुळे दुधात वेलची मिसळली की त्यातील पोषकतत्त्वात वाढ होते. यामुळे हे फायदेशीर आहे.
वेलचीचे दूध हाडांच्या मजबुतीसाठी खूप चांगले मानले जाते. वृद्ध लोकांना विशेषतः वेलची मिसळलेले दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात वेलची तुमची पचनक्रिया चांगली ठेवते, त्यामुळे दूध हाडे मजबूत करण्याचे काम करते. तसेच कॅन्सरसारखे आजारही टाळता येतात. यामध्ये कॅन्सरचा धोका टाळण्यास मदत करणारे सर्व घटक असतात.
तसेच उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठीही वेलचीचे दूध खूप फायदेशीर आहे. वेलची आणि दूध या दोन्हीमध्ये मॅग्नेशियम आढळते, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. यामुळे अनेकजण याचे सेवन करताना आपण बघत असतो. याचे सेवन केल्यास दवाखान्यात जावे लागत नाही.
तसेच पोट खराब होणे आणि पोटात उष्णता वाढणे यामुळे तोंडात अल्सर होण्याची समस्या निर्माण झाली असेल तर वेलची अवश्य खावी. वेलचीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 6, प्रोटीन, फायबर, रिबोफ्लेविन, नियासिन इत्यादी अनेक पोषक घटक आढळतात. वेलची दुधात मिसळून घेतल्यास त्याचे फायदे वाढतात.
महत्वाच्या बातम्या;
घरात लग्नाची घाई असताना शेतकऱ्यांच्या गोठ्यात अग्नितांडव, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
आंब्याची कोय फेकून देताय? थांबा जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे..
Kharif Season: अजित पवारांनी मिटवला खरिपाचा प्रश्न, पीक पध्दतीबाबत दिला मोलाचा सल्ला...
Published on: 15 May 2022, 05:10 IST