तुम्हाला हे माहिती असणे गरजेचे आहे की, गांजाचे सेवन (Marijuana consumption) केल्यास किंवा गांजा बाळगण्यास बंदी आहे. गांजाची शेती केली तरी कारवाई होऊ शकते. मात्र गांजाची नशा कितीवेळ राहू शकते? याबाबत तुम्हाला कधीतरी प्रश्न पडला असेल तर चला जाणून घेऊया.
माहितीनुसार गांजाचा नशेचा परिणाम माणासाचा आहार आणि आरोग्य कसा आहे यानुसार ठरत असतो. ऑस्ट्रेलियातील सिडनी(Sydney, Australia) विद्यापीठातील सायकोफार्माकोलॉजिस्ट लेन मॅकक्रेगर यांनी स्पष्ट केले आहे की, जर एखाद्या व्यक्तीने गांजाचे सेवन केले तर त्याच्या शरीरात टेट्राहाइड्रोकानाबिनॉल नावाचे रसायन अनेक आठवड्यांपर्यंत असते.
हे असे रसायन (Chemistry) आहे ज्यामुळे माणूस नशा होतो. हे रसायन माणसाला काही तास नशेत ठेवू शकत असलं, तरी शरीरात ते दीर्घकाळ राहतं. 80 विविध प्रकारच्या अभ्यासांचं विश्लेषण (Analysis) केल्यानंतर, शास्त्रज्ञांना आढळले की गांजाची नशा 3 ते 10 तासांपर्यंत टिकतो.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कमाल! गटशेतीतून घेतले तब्बल 10 हजार क्विंटल बटाट्याचे उत्पादन
किमान 5 तास प्रभाव राहतो
सिडनी युनिव्हर्सिटीचे (University of Sydney) पोषणतज्ञ डॅनियल मॅककार्टनी, जे संशोधनाचे नेतृत्व करत आहेत, म्हणतात की "गांजाचा उच्च डोस एखाद्याला जास्तीत जास्त 10 तास नशा ठेवू शकतो. न्यूरोसायन्स अँड बायोबिहेविअरल रिव्ह्यूजमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असे सूचित होते की काही लोक जे दररोज गांजाचं सेवन करतात ते नशेत असताना त्यांचे काम करण्यास सक्षम असतात. त्यामुळे, गांजा किती काळ एखाद्याला नशेत ठेवू शकते हे सांगणे थोडे कठीण आहे, तरीही त्याचा प्रभाव किमान 5 तास राहतो".
महत्वाच्या बातम्या
सणासुदीच्या दिवसात सर्वसामान्यांना महागाईचा फटका; ज्वारी, बाजरी, तांदळाच्या दरात वाढ
१८ ते २६ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा; उजळणार भाग्य
केशरचे पाणी आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही ठरतेय अद्भूत; वाचा सविस्तर
Published on: 16 October 2022, 10:46 IST