सर्वांच्या दैनंदिन जीवनात लागणारी गोष्ट म्हणजे दूध. दुधाचा आपल्या सर्वांच्या आहारात समावेश असतो. असे असताना दूध हे अनेकदा खराब होते, यामुळे ते फेकूनही द्यावे लागले, मात्र ते योग्यरित्या ठेवले तर ते खराब होण्याची शक्यता कमी असते. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे दूध खराब होण्याची भीती असते. पण, तुम्हाला माहीत आहे का, उन्हाळ्यात काही भांड्यांमध्ये दूध साठवून ठेवल्यास ते अनेक दिवस खराब होण्यापासून वाचवता येते.
याबाबत अनेकांना माहिती नाही, आता दूध साठवण्यासाठी आपण प्लास्टिकचा कॅन/डब्ब्यांचा वापरू शकता. बाजारात प्लास्टिकचे डबे सहज उपलब्ध आहेत. त्यात दूध साठवण्यासाठी प्रथम दूध चांगले उकळून थंड करावे. नंतर दूध प्लास्टिकच्या डब्यात घालून ठेवा. यामध्ये दुध खराब होण्याचे प्रमाण कमी असते. तसेच अनेक दिवस दूध साठवण्यासाठी काचेच्या बाटलीमध्ये दूध ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये देखील दूध खराब होत नाही.
यासाठी दूध चांगले उकळून घ्यावे. नंतर ते थंड करून काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. दोन दिवस हे दूध खराब होत नाही. तसेच दूध चांगलेही राहते. विशेष करून उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर दूध खराब होते. यामुळे ते वाया जाण्याची शक्यता निर्माण होते. दुधाची चव तशीच टिकवून ठेवायची असेल, तर दूध स्टीलच्या भांड्यात साठवणे उत्तम पर्याय आहे. पण यामध्ये दूध खराब होते.
मित्रांनो गाडीची टाकी करा आजच फुल्ल! पेट्रोल पंपावर होणार खडखडाट...
दूध ठेवण्यापूर्वी स्टीलचे भांडे पूर्णपणे स्वच्छ करा. जेणेकरून त्यात अगोदरचे काही पदार्थ चिकटून राहणार नाहीत. अन्यथा तुमचे दूध लवकर खराब होऊ शकते. यामुळे ते चांगले आहे का हे आधी तपासून घ्यावे. अशा प्रकारे जर तुम्ही दूध साठवून ठेवले तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे. यामुळे तुमचे आर्थिक नुकसानही होणार नाही.
महत्वाच्या बातम्या;
श्रीलंकेनंतर अजून एक देश आर्थिक संकटात, अन्नधान्यही संपले, भारताकडे मदतीची मागणी
यावर्षीही शेती परवडणार की नाही? बियाणांच्या दरात मोठी वाढ, सोयाबीन बॅग मागे 1 हजाराची वाढ
पाकिस्तानची उतरती कळा सुरू!! एकाच दिवशी पेट्रोलचे दर 30 रुपयांची वाढवले...
Published on: 28 May 2022, 12:01 IST