अनेकांना वेळी अवेळी चांगल्या वाईट आहारामुळे अनेक आजारांची लक्षणे उद्भवत असतात. अनेकांना कित्येक आजारांना (disease) सामोरे देखील जावे लागते. अशाच उद्भवणाऱ्या छोट्या मोठ्या आजारांवर उपाय असलेल्या एका भाजीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
कांटोला भाजीविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. या भाजीमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. या भाजीला सर्वोत्तम भाजी म्हणून ओळखली जाते. ही भाजी चवीला देखील सर्वोत्तम ठरली आहे.
विशेष म्हणजे लठ्ठपणापासून ते मधुमेह, बीपी नियंत्रण, कॅन्सर, फ्लू यांसारख्या अनेक मोठ्या आजारांवर ती रामबाण उपाय ठरत आहे. बरेच लोक याला व्हेज चिकन देखील म्हणतात. मात्र, ज्या पद्धतीने ते बनवले जाते त्याप्रमाणे याची चव देखील वाढते. महत्वाचे म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील या भाजीच्या सेवनाने सुधारते.
शेतकऱ्यांनो पुसा तेजस गव्हाचे वाण लागवडीसाठी फायदेशीर; फक्त 125 दिवसात मिळणार भरपूर उत्पादन
या आजारांवर नियंत्रण ठेवते
या भाजीच्या सेवनाने केल्याने छोट-मोठ्या आजारांवर मात होऊ शकते. महत्वाचे म्हणजे डोकेदुखीमध्ये आराम मिळतो. यासह मायग्रेनसारखे आजारही दूर होतात. विशेष म्हणजे यामध्ये अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असून फायटोकेमिकल्स आढळतात, त्यामुळे त्वचाही चांगली राहते.
रेशनकार्ड सुरू ठेवायचे असेल तर ताबडतोब करा 'ही' माहिती अपडेट; जाणून घ्या प्रक्रिया
यासह मुळव्याध, बद्धकोष्ठता या तक्रारीतही ही फायदेशीर आहे. ज्यांना मलावरोधाचा त्रास होत असेल त्यांनी रोज भाजी खाण्याची गरज आहे. यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. फायबर, फॅट आणि प्रथिने भरपूर असतात, त्यामुळे कॅन्सर, मधुमेह आणि बीपीही नियंत्रणात राहतो.
यामध्ये लोह देखील भरपूर आहे, म्हणून या भाजीला जगातील सर्वात शक्तिशाली भाजी बोलले जाते. कांटोला भाजी कारल्याप्रमाणे तेलात तळून देखील तुम्ही खाऊ शकता. याच्या बिया देखील खूप फायदेशीर आहेत.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांनो रब्बी कांदा लागवड करताना 'या' पद्धतीचा वापर करा; होईल चांगली कमाई
पीएम किसान योजनेत मोठा बदल; आता 'या' शेतकऱ्यांनाच मिळणार 12 वा हप्ता
सावधान! या लोकांसाठी ठरू शकतो अडचणींचा काळ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Published on: 26 September 2022, 11:20 IST