Health Tips: दूध (Milk Benifits) आणि गूळ (Jaggery Benifits) दोन्ही शरीरासाठी खूपच फायदेशीर (Health Benifits) आहेत. एकामध्ये कैल्शियम असते तर दुसरे पोटाच्या समस्यांमध्ये आराम देते. परंतु या दोन्हींचे एकत्र सेवन करणे अधिक फायदेशीर आहे. या दोन्ही पदार्थमुळे आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळत असतात.
या दोन्ही पदार्थात असलेले औषधी गुणधर्म मानवी आरोग्यास खूपच फायदेशीर असल्याचा दावा केला जातो. अशा परिस्थितीत आज आपण या दोन्ही पदार्थांचे एकत्रित सेवन केल्यास कोणकोणते फायदे होतात याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया दूध आणि गुळ एकत्रित खाल्ल्याने होणारे फायदे.
गूळ आणि दूध एकत्रित खाल्ल्यास होणारे फायदे
- दूध आणि गूळ यांचे मिश्रण पिल्याने स्नायू मजबूत होतात. दुधामध्ये प्रथिनेचा प्रमाण जास्त असल्याने दूध स्नायूंना बळकट बनवण्यास मदत करते. या पेयामुळे स्नायूंच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो.
- दूध आणि गूळ दोन्ही एकत्र मिसळून सेवन केल्याने सांधेदुखी देखील कमी होते. दूध आणि गुळापासून शरीराला कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन डीचा पुरवठा होतो.
- दूध शरीरात ऊर्जा वाढवते, तर दुसरीकडे गुळामुळे रक्त शुद्ध होते. दूध आणि गूळ दोन्ही एकत्र पिल्याने ते मिश्रण हेल्दी एनर्जी ड्रिंक म्हणून काम करते.
- दूध आणि गूळचा पेय शरीरातील उर्जा पूर्ण करते हे आपल्याला माहित आहे म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी नक्की पित जा. दिवसभर काम करून शरीर थकते, ते या पेयाने दूर होईल. दूध आणि गूळचा पेय झोप सुधारते.
- हे पेय पिल्याने पिंपल्स आणि डाग येण्याची शक्यता देखील कमी होते.
- गूळ आणि दूध एकत्र करून पिल्याने पचनक्रिया देखील सुधारते, अपचन, बद्धकोष्ठता इत्यादी पोटाच्या समस्यांमध्ये आराम मिळतो.
- गर्भवती महिलांना हे पेय पिल्याने खूप आराम मिळतो. त्यामुळे थकवा आणि अशक्तपणा देखील दूर होतो.
Published on: 20 July 2022, 08:00 IST