पपईचे सेवन मानवी आरोग्यासाठी विशेष फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अनेक लोक पपईचे सेवन करत असतात. पपई खाना स्वादिष्ट असते शिवाय बारामही उपलब्ध असल्याने तसेच बाजारपेठेत सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने अनेक लोक याचे मोठ्या प्रमाणात सेवन करत असतात. यामध्ये असलेले औषधी गुणधर्म मानवी आरोग्यास खूप फायद्याचे असल्याचे सांगितले जाते. पपईचे सेवन जर नियमित केले गेले तर यामुळे पोटाचे विकार दूर होण्यास मदत होते.
एवढेच नाही तर यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्म कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. पपई प्रमाणेच केळी मध्ये देखील अनेक औषधी गुणधर्म असतात जे की मानवी आरोग्यास विशेष फायद्याचे ठरतात. असे सांगितले जाते की केळीचे नियमित सेवन केल्यास शरीरास आवश्यक पोटॅशियम प्राप्त होतं असते. पोटॅशियम हाडे मजबूत करण्यास मदत करत असते. परंतु असे असले तरी, केळी आणि पपई दोघे एकत्रितपणे सेवन केल्यास मानवी शरीरास अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात. आज आपण केळी आणि पपई दोघे एकत्रितपणे खावे की नाही याविषयी जाणून घेणार आहोत.
हेही वाचा:- Health Tips: गूळ खाल्ल्यानंतर लगेचच कोमट पाणी प्या; मिळतील जबरदस्त फायदे; वाचून तुम्हीही व्हाल थक्क
केळी आणि पपई सोबत खाल्याने आरोग्यवर विपरीत परिणाम होतो का?
आहार तज्ञांच्या मते, केळी आणि पपई दोघे एकत्रित खावे की नाही हे सर्वस्वी व्यक्तीच्या पाचन तंत्र वर निर्धारित असते. अनेक लोकांचे पाचन तंत्र कमजोर असते अशा लोकांना अनेक पोटासंबंधी विकार असतात त्यामुळे अशा लोकांनी पपई आणि केळी सोबतच खाल्ले तर त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम बघायला मिळू शकतो. ज्या लोकांची पचनक्रिया सुरळीत होत असते अशा लोकांना केळी आणि पपई दोघे एकत्रित खाल्ले तरी काहीचं समस्या जाणवत नाही.
असे असले तरी आयुर्वेदामध्ये पपई आणि केळी दोघेही परस्परविरोधी गुणधर्म असलेले फळ म्हणून नमूद केले गेले आहेत. म्हणून आयुर्वेद केळी आणि पपई एकत्रित खाण्याचा सल्ला देत नाही. केळी आणि पपई एकत्रित खाल्ल्याने मानवी पचन तंत्रावर विपरीत परिणाम होतो. यामुळे अपचन सारख्या समस्या उद्भवू शकतात. या दोघांचे एकत्रित सेवन केल्यास उलटी, मळमळ, अशक्तपणा यांसारख्या समस्या होऊ शकतात. याव्यतिरिक्त गर्भवती महिलांनी केळी आणि पपई चे सेवन टाळावे. तसेच ज्या लोकांना सर्दी खोकला असतो त्यांनीदेखील पपई आणि केळी दोघांचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.
Published on: 13 March 2022, 05:17 IST