Health

अनेकदा आपण आजारी पडतो, असे असताना अनेक औषधे देखील आपण घेत असतो मात्र यामुळे देखील अनेकदा आपल्याला फरक पडत नाही. मात्र अशी काही नैसर्गिक औषधे असतात, यामधून आपण बरे होऊ शकतो. ही औषधे आपल्या घरातच असतात. तसेच अनेकांना संधीवाताचा त्रास देखील असतो. संधीवात, सांधेदुखी आणि किडणीच्या अनेक समस्या यामुळे सुरू होतात. युरिक ॲसिडची पातळी नियंत्रणात ठेवणं, हाच या समस्यांपासून वाचण्याचा एकमेव उपाय असतो.

Updated on 25 June, 2022 2:11 PM IST

असे असताना मात्र यावर एक भाजी फायदेशीर ठरते. यामुळे तुम्हाला यामधून सुटका मिळेल. कोबी ही सर्व ऋतुंमध्ये मिळणारी भाजी संधीवातावर गुणकारी ठरत असल्याचे दिसून आले आहे. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते कोबीच्या पानामुळे संधीवाताचं दुखणं कमी होण्यास मदत होते. कोबीमुळे संधीवात पूर्णपणे बरा होऊ शकतो, असा दावाही काही आयुर्वेदातील तज्ज्ञ करत असतात.

कोबीतील गुणांमुळेच युरिक ॲसिडची पातळी कमी व्हायला मदत होत असल्याचा दावा करण्यात येतो. यामध्ये जेव्हा संधीवाताचं दुखणं सुरू होईल, तेव्हा फ्रीजरमधील कोबीचं पान काढून दुखणाऱ्या ठिकाणी गुंडाळून ठेवावं. तसेच यानंतर एक टॉवेल घ्यावा आणि कोबीभोवती बांधून टाकावा. शरीरातील उष्णतेमुळे कोबीचं थंड असलेलं पान गरम होऊ लागतं आणि या प्रक्रियेमध्येच कोबीतील काही घटक शरीरात शोषले जातात. दुखणाऱ्या जागी साठलेल्या युरिक ॲसिडचा प्रभाव हे घटक कमी करतात. यामुळे हे फायदेशीर ठरते.

कारल्यातून लाखोंची कमाई! उत्पादनाबरोबरच वाढीव दराने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस

यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते, त्या ठिकाणची सूज उतरायला यामुळे मदतच होते. जर या उपायामुळे खाज सुटत असेल किंवा ॲलर्जी होत असेल, तर मात्र कोबी तिथून काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. हा घरगुती उपाय असून तुम्हाला काही गंभीर आजार असेल, तर मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच या गोष्टी कराव्यात.

महत्वाच्या बातम्या;
PM Kisan योजनेत मोठा बदल, आता मिळणार ४ हजार रुपये, 'ही' कागदपत्रे जमा करावी लागणार
राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस, शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरु...
राज्यात हजारो कोटी रुपयांचे GR जारी करण्याचा धडाका, सरकार पडण्याची भीती?

English Summary: Cabbage is good for rheumatism
Published on: 25 June 2022, 02:11 IST