Health

काळी द्राक्षे ही आयुर्वेदानुसार औषधी व श्रेष्ठ मानली जातात. काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळे मनुकेही अनेक पोषक घटकांनी युक्त असतात. हे काळे मनुके उपाशी पोटी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे काळे मनुके नियमित खाल्ल्याने हृदय विकारापासून मुक्तता मिळवता येते.

Updated on 31 January, 2023 10:20 AM IST

काळी द्राक्षे ही आयुर्वेदानुसार औषधी व श्रेष्ठ मानली जातात. काळी द्राक्षे प्रक्रिया करून वाळवून त्याच्या मनुका तयार केल्या जातात. काळे मनुकेही अनेक पोषक घटकांनी युक्त असतात. हे काळे मनुके उपाशी पोटी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे काळे मनुके नियमित खाल्ल्याने हृदय विकारापासून मुक्तता मिळवता येते.

काळ्या मनुक्यात एन्थोकाइनिन्स (anthocyanins), पॉलीफेनॉल, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन-सी, गामा-लिनोलेनिक एसिड (GLA), पोटशियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस असे अनेक पोषक घटक असतात. काळ्या मनुक्यांमुळे रक्त प्रवाह वाढतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते. तसेच काळे मनुके हे हृदय, डोळे आणि किडनीच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

1) ह्रदय विकाराचा धोका कमी करते :
काळ्या मनुक्यात हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. पोटॅशियम हृदयाला बळ देते व हृदय विकारांचे प्रमाण कमी करते. याशिवाय काळ्या मनुकात असणाऱ्या Resveratrol ह्या घटकामुळे रक्ताचा प्रवाह व्यवस्थित होतो, रक्तात गुठळ्या होत नाही, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होत असल्याने काळ्या मनुकामुळे हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

2) रक्तदाब नियंत्रित ठेवते :
काळ्या मनुकात पोटॅशियम आणि GLA चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. दररोज काळ्या मनुका खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. हाय ब्लडप्रेशरमुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक (पक्षाघात) आणि किडन्या निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे आवश्यक असते.

3) हिमोग्लोबिन व रक्त वाढवते :
काळ्या मनुक्यात लोह व इतर जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. यासाठी 10 ते 12 काळ्या मनुका वाटीभर पाण्यात भिजत घालून त्यात थोडासा लिंबूरस घालावा. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेले मनुके चावून खावेत. यामुळे रक्तारील हिमोग्लोबिन वाढते त्याचबरोबर रक्त शुद्ध होते आणि रक्ताचे प्रमाणही वाढते.

शेतकऱ्यांनो या प्रकारे करा आंबा मोहोराचे संरक्षण

4) डोळ्यांचे आरोग्य सुधारते :
काळ्या मनुकामध्ये डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे Lutein आणि Zeaxanthin हे घटक असतात. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय यामुळे रेटिनामध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होत नाही त्यामुळे अकाली अंधत्व येण्यापासून बचाव होतो.

5) डायबेटीससाठी उत्तम :
काळ्या मनुकातील Pterostilbene हा घटक डायबेटीसमध्ये उपयुक्त ठरतो. यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते. शिवाय काळ्या मनुकांचा Glycemic index 70 पेक्षाही कमी असल्यामुळे ते मधुमेही रुग्णांसाठी योग्य ठरतात.

6) अशक्तपणा दूर होतो :
दररोज सकाळी भिजलेले काळे मनुका खाल्ल्यामुळे अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. यामध्ये व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-K, व्हिटॅमिन-A, विविध मिनरल्स यासारखे अनेक पोषकघटक असल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

7) पोट साफ होते :
काळ्या मनुका सारक गुणांच्या असतात. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. यासाठी 10 ते 12 मनुका पाण्यात भिजवून रात्री खाल्यास सकाळी पोट साफ होऊन बद्धकोष्ठता दूर होते.

8) पित्त कमी करते :
काळ्या मनुका ह्या पित्तशामक गुणांच्या असतात. त्यामुळे पित्त कमी होण्यास मदत होते. ऍसिडिटी किंवा आम्लपित्ताचा त्रास असल्यास दररोज सकाळी भिजलेले काळे मनुका खाणे उपयुक्त ठरते.

9) मेंदूसाठी उपयुक्त :
काळे मनुका खाण्यामुळे मेंदू तल्लख होऊन स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. मानसिक तणाव, नैराश्य दूर करण्यासही काळ्या मनुका उपयुक्त ठरतात.

निसर्ग हा जिवाणुच्या मदतीने चालवतो नत्राचे चक्र...

10) वंध्यत्व समस्येवर उपयुक्त :
काळ्या मनुका वृष्य गुणांच्या असल्यामुळे पुरुषांमध्ये शुक्रधातुचे प्रमाण वाढवतात तर स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या विकारात उपयुक्त ठरतात. काळ्या मनुका नियमित खाण्यामुळे मासिक पाळीच्या तक्रारी दूर होतात. पाळीच्या वेळी रक्त जास्त जाणे, अशक्तपणा येणे, स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन कमी होणे यासारख्या समस्या दूर होतात.

काळे मनुके कसे खावे..?
सुक्या मेव्यातील काळ्या मनुका तशाही खाऊ शकतो किंवा 10 ते 12 काळ्या मनुका रात्री वाटीभर पाण्यात भिजत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी भिजलेले मनुका उपाशीपोटी खाणे जास्त लाभदायी ठरते.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो शेतीमध्ये जिवामृत तंत्रज्ञान महत्वाचे
कलिंगड, खरबुज लागवड आणि व्यवस्थापन
माती परीक्षण म्हणजे शेतीची गुरूकिल्ली

English Summary: Black currants very beneficial, black currants empty stomach, avoid heart disorders
Published on: 31 January 2023, 10:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)