देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. भारतात पुन्हा नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. देशात आज दिवसभरात तब्बल 4 हजार 435 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे खळबळ उडाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
आरोग्य यंत्रणा सध्या अलर्ट झाली आहे. देशात सध्या एकूण 23 हजार सक्रीय रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे. पुणे जिल्ह्यात दिवसभरात 98 कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. कोरोनामुळे दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला. पुणे मनपा हद्दीत 63 कोरोना रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात अजूनही 756 सक्रीय रुग्णसंख्या असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे.
मुंबईत काल 221 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मुंबईत दिवसभरात 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या 1 हजार 244 सक्रिय रुग्ण आहेत.
धक्कादायक! मराठवाड्यात तीन महिन्यांत 214 शेतकरी आत्महत्या, दररोज दोन जणांच्या आत्महत्या..
मुंबईत दररोज 200 पेशा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. यामुळे येणाऱ्या काळात काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच मास्क देखील वापरावे लागणार आहे. तसेच दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली. दिल्लीत 24 तासांत 509 लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर, दिल्लीतील पॉझिटिव्ह दर 26.54 टक्क्यांवर पोहोचला आहे. राजधानीच्या पॉझिटीव्हिटी दरात एकाच दिलसात मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे.
राज्यातील ऊस तोडणी मशिन मालक संघटनेचे आंदोलन, राजू शेट्टी मैदानात..
एका दिवसापूर्वी हा पॉझिटीव्हिटी दर 15.64 टक्के होता. म्हणजेच, 24 तासांत पॉझिटिव्हिटी दर 10.9 टक्क्यांनी वाढला आहे. दिल्लीतील आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 1918 जणांची चाचणी करण्यात आली होती. ज्यामध्ये 509 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं आढळून आलं आहे. दरम्यान, दिल्लीत कोरोनामुळे एकाही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही. दिल्लीत सध्या 1795 सक्रिय रुग्ण आहेत.
निवडणुकीसाठी १७ बाजार समित्यांकडे पैसेच नाहीत, निवडणूक होणार नाही...
'या' गावात जनावरांना साप्ताहिक सुट्टी. गावकरी या दिवशी दूध काढत नाहीत, बैलांना कामेही सांगितली जात नाहीत..
कर्जत जमखेडचा दुष्काळ हटणार! रोहित पवार यांच्या पुढाकाराने 43 गावांमध्ये काम सुरू...
Published on: 06 April 2023, 11:01 IST