दिवाळी म्हंटल्यावर फराळ आलाच. यासाठी चकल्या, करंज्या, शंकरपाळी, मठरी, शेव तयार करण्यासाठी अगदी उत्तम दर्जेच्या वस्तू (Good quality items) वापरल्या जातात. मात्र एक मोठी चूक घडते ती म्हणजे तळलेल्या पदार्थांमधील तेल वितळण्यासाठी वर्तमानपत्राचा अनेकजण वापर करतात.
जर तुम्ही ही चूक करीत असाल तर याकडे दुर्लक्ष करु नका. कारण यामुळे गंभीर आजाराचा धोका तुम्हाला पत्करावा लागू शकतो. दिवाळीत तयार केले जाणारे अनेक पदार्थ तळलेले असतात आणि अशात तेल टिपण्यासाठी अनेक जण घरात रद्दी म्हणून पडलेले कागद किंवा वर्तमानपत्र वापरतात.
कागदावर पदार्थ पसरवले जातात आणि गार झाल्यावर डब्ब्यांमध्ये भरले जातात. परंतु हे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. कारण यासाठी वापरली जाणारी शाही आरोग्याला अत्यंत धोकादायक असते. यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
Horoscope: येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
या आजारांना सामोरे जावे लागते
1) मासिके किंवा वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. अशात शाईमधील ग्राफाईट हा घटक घातक असल्याने कॅन्सरचा धोका देखील असतो.
2) शरीरातील विषारी घटक मूत्रविसर्जनातून किंवा शौचातून बाहेर पडत असतात. परंतु ग्राफाईट शरीरात साचून राहतो. याचा थेट परिणाम किडनी आणि फुफ्फुसांवर होतो.
3) वर्तमानपत्रामधील शाईतील सॉल्वंट्स पचनक्रियेत बिघाड करते. तसेच हार्मोन्सच्या पातळीमध्ये संतूलन बिघडविते. परिणामी कॅन्सरचा धोका वाढतो.
पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; हरभरा आणि गहू बियाणे अनुदानावर मिळणार
4) तसेच काही लोकांचा गैरसमज आहे की न्यूजपेपरपेक्षा मासिकाचा कागद अधिक दर्जेचा असतो पण जाणून घ्या की हा कागद अधिक ग्लॉसी बनवण्यासाठी तसेच शाई स्प्रेड होऊ नये, म्हणून वापरले जाणारे घटक अधिक धोकादायक असतात.
5) त्यामुळे अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा किचन पेपर टॉवेलचा वापर करा. परंतु जर तुम्हाला कागदाचाच वापर करायचा असेल तर छपाई न केलेला कागद वापरा.
महत्वाच्या बातम्या
तुती लागवडीतून शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; रोपवाटीकेचे करा असे नियोजन
मोदी सरकारने आखला मोठा प्लॅन! बी-बियाणे, खते व माती परीक्षणाची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध
धक्कादायक! पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्याकडे पैशांची मागणी
Published on: 18 October 2022, 01:39 IST