केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना (New plans) राबवत असतं, ज्यातून शेतकऱ्यांना फायदा होईल. मात्र योजनेचा लाभ वेळेत घेणे तितकेच गरजेचे असते. हरियाणा सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी यंत्रे (Agricultural machinery) दिली जात आहेत.
यांत्रिकीकरण योजना 2022-23 अंतर्गत अनुदानाच्या लाभासाठी अर्ज करणारे शेतकरी 21 जुलैपर्यंत त्यांची बिले सादर करू शकतात. कृषी विभागाचे उपसंचालक डॉ. वजीर सिंग यांनी माहिती दिली आहे. शेती (agriculture) करणे सोयीस्कर करण्यासाठी हरियाणा सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदानावर (Subsidies to farmers) कृषी यंत्रे दिली जातात.
मत्स्यपालनासाठी सरकार देतंय 60% अनुदान ; सरकारच्या 'या' योजनेचा घ्या लाभ
याअंतर्गत 2022-23 या वर्षासाठी पानिपत जिल्ह्यातील 170 शेतकऱ्यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग,(Department of Agriculture and Farmers Welfare) हरियाणा यांच्या वेबसाइटवर अर्ज केले होते, त्यात भात पेरणी यंत्रासाठी 18, ट्रॅक्टर चालित स्प्रे पंपसाठी 19, पॉवर टिलरसाठी 6 अर्ज केले होते. तणनाशक (स्वयंचलित आणि ट्रॅक्टर चालवणाऱ्या) साठी 114 आणि वायवीय प्लँटरसाठी (मका, बार्ली, गहू पेरणी यंत्र) 13 अर्ज प्राप्त झाले.
शेतीतून लाखों रुपये कमवायचे आहेत? तर 'या' जोडव्यवसायातून लाखोंमध्ये घ्या कमाई
या कृषी यंत्रांवर (Agricultural machinery) अनुदानासाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी 10 जुलैपर्यंत त्यांची बिले सहाय्यक कृषी अभियंता पानिपत यांच्या कार्यालयात जमा करायची होती. मात्र काही कारणास्तव सर्व शेतकऱ्यांना त्यांची बिले मिळू शकली नाहीत, त्यामुळे संपूर्ण राज्यात बिले सादर करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे.
यांत्रिकीकरण योजना 2022-23 अंतर्गत अनुदानाच्या लाभासाठी अर्ज करणारे शेतकरी 21 जुलैपर्यंत त्यांची बिले सादर करू अशी माहिती कृषी विभागाचे उपसंचालकांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
'या' योजनेचा लाभ घेताना चुकीची माहिती देऊ नका; अन्यथा बसेल मोठा फटका
'या' योजनेच्या 'ई-केवायसी' चे सर्व्हर डाउन ; शेतकऱ्यांवर ई-सेवा केंद्रांवर हेलपाटे मारण्याची वेळ
'या' योजनेचा लाभ घेताना चुकीची माहिती देऊ नका; अन्यथा बसेल मोठा फटका
Published on: 21 July 2022, 09:43 IST