पोस्ट ऑफिसच्या (post office scheme) अनेक योजना आहेत. ज्यामधून ग्राहक चांगला नफा कमवू शकतात. सुरक्षित आणि चांगला परतावा मिळेले अशा योजनेविषयी आज माहिती जाणून घेणार आहोत.
पोस्ट ऑफिसच्या अनेक योजणांपैकी किसान विकास पत्र (kisan vikas patra) ही एक खास योजना आहे. काही पोस्ट ऑफिस योजना दीर्घकालीन गुंतवणुकीवरही तुमचे पैसे दुप्पट करू शकतात, अशीच एक योजना म्हणजे किसान विकास पत्र योजना.
इंडिया पोस्ट ऑफिससोबत केंद्र सरकार गुंतवणूक आणि बचतीच्या अनेक योजना चालवते. ही गुंतवणुकीची माध्यमे तुम्हाला केवळ हमी परतावाच देत नाहीत तर तुमचे पैसेही सुरक्षित ठेवतात. शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरू शकते.
पोस्ट ऑफिसच्या काही योजनांमध्ये, मुदत ठेव खात्यापेक्षा जास्त व्याजदराने पैसे उपलब्ध आहेत. तर काही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीवर तुमचे पैसे दुप्पट करू शकतात. अशी एक योजना आहे- किसान विकास पत्र, ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला दुप्पट परतावा मिळतो.
रेशनकार्ड सुरू ठेवायचे असेल तर ताबडतोब करा 'ही' माहिती अपडेट; जाणून घ्या प्रक्रिया
किसान विकास पत्र योजनेचे फायदे आणि इतर वैशिष्ट्ये
किसान विकास पत्र दरवर्षी चक्रवाढ व्याज दराने गुंतवणूकदाराला पैसे देते. इंडिया पोस्टच्या (india post) वेबसाइटनुसार, सध्या याला वार्षिक ६.९% दराने चक्रवाढ व्याज मिळते. हे दर 1 एप्रिल 2020 पासून लागू आहेत. 124 महिन्यांत तुमचे पैसे दुप्पट करते. म्हणजेच, जर तुम्ही आज त्यात 5 लाख रुपये गुंतवले तर ते पुढील 10 वर्ष, 4 महिन्यांत तुमचे 10 लाख परतावा देईल.
त्याची परिपक्वता कालावधी 10 वर्षे 4 महिने आहे. या योजनेत तुम्ही किमान रु 1,000 पर्यंत गुंतवणूक करू शकता, कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. सरकार किसान विकास पत्र प्रमाणपत्र रु. 1 हजार, रु. 5 हजार, रु. 10 हजार, रु. 50 हजार च्या मूल्यांमध्ये विकते. खातेदार त्यांचे पैसे 2 वर्ष 6 महिन्यांत काढू शकतात.
सावधान! या लोकांसाठी ठरू शकतो अडचणींचा काळ; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
लाभार्थी
कोणतीही प्रौढ व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. संयुक्त खाते देखील उघडले जाऊ शकते, परंतु एका खात्यात तीनपेक्षा जास्त लोक असू शकत नाहीत. अल्पवयीन किंवा आजारी व्यक्तीच्या नावाने पालक खाते उघडले जाऊ शकते. 10 वर्षांवरील अल्पवयीन व्यक्ती स्वतःच्या नावाने ते उघडू शकतो.
ही कागदपत्रे आवश्यक
KVP अर्ज फॉर्म (form), आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, वय प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो सरकारच्या वतीने पोस्ट ऑफिसद्वारे किसान विकास पत्र उपलब्ध करून दिले जाते. किसान विकास पत्र प्रमाणपत्रे रोख, चेक, पे ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे खरेदी केली जाऊ शकतात. तुम्ही या लिंकला भेट देऊन फॉर्म डाउनलोड करू शकता. तसेच तुम्ही हा फॉर्म ऑफलाइन भरू शकता आणि आवश्यक कागदपत्रांसह पोस्ट ऑफिसमध्ये सबमिट करू शकता.
महत्वाच्या बातम्या
भारीच की! ही एकच भाजी सर्व आजारांवर करतेय मात; एकदा खाऊन पहाच...
शेतकऱ्यांनो रब्बी कांदा लागवड करताना 'या' पद्धतीचा वापर करा; होईल चांगली कमाई
पीएम किसान योजनेत मोठा बदल; आता 'या' शेतकऱ्यांनाच मिळणार 12 वा हप्ता
Published on: 26 September 2022, 12:22 IST