प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सरकारी योजना असून असंघटित क्षेत्रातील काम करणाऱ्यांनासामाजिक सुरक्षा प्रदान करते.यामध्ये संपूर्ण देशातीलमजुरांना सरकारकडून प्रत्येक महिन्यात तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते.
वर्ष 2019 मध्ये केंद्र सरकारने मंत्री श्रम योगी मानधन पेंशनयोजनेची सुरुवात केली होती.या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 46 लाख 66 हजार 489लोक जोडले गेले आहेत.विशेष म्हणजे या योजनेत पुरुषांपेक्षा महिलांचे संख्या जास्त आहे.26 ते 35 वर्ष वयाचे लोकांमध्ये ही योजना खूपच पॉप्युलर आहे. अगदी कमीत कमी रक्कम या योजनेत जमा करून वयाच्या 60 वर्षानंतर प्रती महिना तीन हजार रुपये म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये पेन्शन मिळते.
प्रतिमहिना जमा करावी लागणारी रक्कम(Per Month Emi)
या योजनेत कोणताही असंघटित क्षेत्रात काम करणारे नागरिक सहभाग नोंदवू शकतात. ज्या कुणाला या योजनेत अर्ज करायचा असेल तर त्यांचे वय कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त चाळीस वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यकआहे.तसेच त्यांचे मंथली इन्कम पंधरा हजार रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
ज्या व्यक्तीचे वय18 वर्षे असेलआणि अशा व्यक्तीस अर्ज करायचा असेल तर अशा अर्जदाराला वयाच्या साठ वर्षापर्यंत प्रतिमहिना पंचावन्न रुपये जमा करावे लागतात. कोणी 29 व्या वर्षी या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी अर्ज केला तर अशा अर्जदारास वयाच्या साठ वर्षापर्यंत प्रति महिना शंभर रुपये जमा करावे लागतातआणि कोणी अर्जदाराने वयाच्या चाळिसाव्या वर्षी या योजनेसाठी अर्ज केला तर प्रति महिना 200 रुपये जमा करावे लागतात. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जितके पैसे जमा करतात तितकेच पैसे सरकारकडून जमा केले जातात.
21 लाख पेक्षा जास्त महिलांनी केले रजिस्ट्रेशन
श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या नुसार,या योजनेमध्ये आतापर्यंत जवळजवळ 21 लाख 56 हजार 763 महिलांनी रजिस्ट्रेशन केले आहे.
त्या तुलनेत पुरुषांची संख्या 19 लाख 23 हजार 31 च्या आसपास आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:खतासंबंधी महत्वाची बातमी! DAP ला मिळाला PROM चा पर्याय, वाचा सविस्तर माहिती
Published on: 13 May 2022, 01:45 IST