Government Schemes

देशातील 50 टक्क्यांहून लोकसंख्येसाठी शेती हा एकमेव उत्पन्नाचा स्रोत आहे. त्यामुळेच सरकारने (government) शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही देखील अशीच योजना आहे.

Updated on 19 August, 2022 12:13 PM IST

देशातील 50 टक्क्यांहून लोकसंख्येसाठी शेती (agriculture) हा एकमेव उत्पन्नाचा स्रोत आहे. त्यामुळेच सरकारने (government) शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही देखील अशीच योजना आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 2 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये मिळून 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पीएम किसान योजनेसंदर्भात (pm kisan scheme) कोणतीही समस्या येत असेल तर तुम्हाला संपर्क कुठे साधायचा याविषयी माहिती असणे गरजेचे आहे.

शेतकरी मित्रांनो 'या' जातीच्या देशी कोंबड्या पाळून मिळवा बंपर नफा; जाणून घ्या

समस्यांसाठी याठिकाणी संपर्क साधा

पीएम किसान (pm kisan) योजनेंतर्गत नोंदणी करण्यापासून ते हप्ते मिळवण्यापर्यंत अनेक वेळा शेतकऱ्यांना (farmers) अडचणींचा सामना करावा लागतो. तुम्हालाही या योजनेबाबत कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक 011-24300606 यावर कॉल करू शकता.

याशिवाय 18001155266 या टोल फ्री क्रमांकावरही शेतकरी संपर्क साधू शकतात. तसेच शेतकरी pmkisan-ict@gov.in वर मेल करून त्यांच्या समस्येचे निराकरण देखील करू शकतात.

Horoscope: 'या' 5 राशीच्या लोकांना मिळणार प्रचंड यश; वाचा आजचे राशीभविष्य

12 वा हप्ता या तारखेला येणार

पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीसाठी पहिल्या हप्त्याची रक्कम दिली जाते. दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर (november) दरम्यान पाठविले जातात. याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान ट्रान्सफर केले जातात.

शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत एकूण 11 हप्ते वर्ग करण्यात आले आहेत. माहितीनुसार 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ऑगस्टच्या (august) शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हस्तांतरित केला जाऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या 
Heavy Rain: शेतकऱ्यांनो पावसापासून पिकांना वाचवण्यासाठी 'या' महत्त्वाच्या गोष्टी करा; होईल फायदा
शेतकऱ्यांनो आता आपला शेतमाल दुसऱ्या राज्यातही विका! वाहतुकीसाठी मिळणार 3 लाखांचे अनुदान
ई-पीक पाहणीच्या नवीन अ‍ॅपवरुन वेळीच प्रक्रिया करा; अन्यथा होईल मोठे नुकसान

English Summary: PM Kisan Yojana Facing problems only one thing
Published on: 19 August 2022, 12:13 IST