Government Schemes

PM Kisan Scheme: केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षातून ६००० हजार रुपये दिले जातात. त्यामुळे शेतीला थोडा का होईना आर्थिक हातभार लागत आहे. मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य करणे केले आहे.

Updated on 02 September, 2022 11:38 AM IST

PM Kisan Scheme: केंद्र सरकारने (Central Goverment) देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan) सुरु केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षातून ६००० हजार रुपये दिले जातात. त्यामुळे शेतीला थोडा का होईना आर्थिक हातभार लागत आहे. मात्र या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने ई-केवायसी (E-KYC) करणे अनिवार्य करणे केले आहे.

मात्र याअगोदरही केंद्र सरकारने ई-केवायसी करण्यासाठी मुदत वाढवली होती. मुदत वाढवूनही लाखो शेतकऱ्यांचे ई-केवायसी करणे राहिले होते. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा ३१ ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवली होती. पण आताही अनेक शेतकऱ्यांचे ई-केवायसी करणे राहिलेच असल्यामुळे केंद्राने पुन्हा एकदा मुदत वाढ केली आहे.

ई-केवायसी प्रमाणीकरण आणि पोर्टलवर डाटा अपलोड करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) यांनी एक महिन्याची मुदतवाढ केली आहे. अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग न नोंदवल्यामुळे पुन्हा हा निर्णय घ्यावा लागला आहे. ३० सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे.

सावधान! महाराष्ट्रासह 11 राज्यांमध्ये लंपी रोगाचा फैलाव, 11 लाखांहून अधिक जनावरे बाधित

पीएम किसान योजनेमध्ये अनेक अपात्र शेतकरी लाभ घेत आहेत. त्यामुळे ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई-केवायसी करण्यासाठी मार्च 2022 पासून आजपर्यंत चार वेळा हा मुदतवाढ झालेली आहे. त्यामुळे आता तरी शेतकरी या वाढीव मुदतीचा फायदा घेणार की नाहीत, हेच पहावे लागणार आहे. ही प्रक्रिया सीएससी केंद्रावर (CSC Centre) किंवा स्वत: शेतकऱ्याला देखील करता येणार आहे.

Cotton Crop: कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! कापसाला मिळणार सोन्याचा भाव

आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ११ हफ्ते जमा झाले आहेत. १२ हफ्ता लवकरच येणार आहे. मात्र त्याअगोदर ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी केल्यानंतरच १२ हफ्ता येणार असल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:
...आणि बाहेरची जनावरे चक्क अजितदादांनी ताणली!! दादांनी सांगितला तो किस्सा
कापूस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! कापसाला मिळणार सोन्याचा भाव

English Summary: PM Kisan Scheme: Relief for farmers! Center's big decision on e-KYC
Published on: 02 September 2022, 11:38 IST