Government Schemes

जिल्हा मध्यवर्ती बॅंक बिगरव्याजी तीन लाखांपर्यंत पीक कर्ज देते. यामुळे शेतीच्या कामांना हातभार लागतो. काही राष्ट्रीयीकृत बॅंका सुरवातीला शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कम घेतात आणि शासनाकडून व्याज मिळाले की त्या- त्या शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा करतात. ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड हवे आहे, त्यांना संबंधित बॅंकेकडे मागणी करता येते.

Updated on 19 July, 2022 3:17 PM IST

शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून सरकारकडून अनेक वेगवेगळ्या योजना आणल्या जातात. काही योजना ह्या फायदेशीर असतात, तर काहींचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. असे असताना आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज बिगरव्याजी दिले जाते. किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघाती विमादेखील मिळतो. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

तसेच यामध्ये शेतकऱ्यांना पीक बदलले किंवा क्षेत्रात वाढ झाल्यास क्रेडिट लिमिट वाढवून मिळते. यानुसार क्रेडिट कार्डवर कर्जाचे लिमिट मंजूर झाल्यानंतर शेतकरी त्याच्याकडील कार्डवरून खते, बी-बियाणे खरेदी करू शकतो. यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. या शेतकऱ्यांना कर्जाचे नवे-जुने देखील करता येते.

दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बॅंक बिगरव्याजी तीन लाखांपर्यंत पीक कर्ज देते. यामुळे शेतीच्या कामांना हातभार लागतो. काही राष्ट्रीयीकृत बॅंका सुरवातीला शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कम घेतात आणि शासनाकडून व्याज मिळाले की त्या- त्या शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा करतात. ज्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड हवे आहे, त्यांना संबंधित बॅंकेकडे मागणी करता येते.

शेतकऱ्यांनो काळजी घ्या, राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार, आता याठिकाणी जोरदार पाऊस पडणार

अनेक शेतकरी बॅंकांकडून जे शेतकरी कर्ज घेतात, त्यांनी किसान क्रेडिट कार्ड आवर्जुन घ्यावे, असे आवाहन सोलापूर जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक प्रशांत नाशिककर यांनी केले आहे. तसेच जनावरांसाठी देखील शेतकऱ्यांना कर्ज मिळते.

महत्वाच्या बातम्या;
गणित करा आणि वापरा फुकट वीज! जाणून घ्या सविस्तर, होईल फायदा..
महाबळेश्वरला जात असाल तर थांबा! महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टी, 16 गावांचे स्थलांत
इंदापूरमध्ये 50 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान, 40 मेंढ्या अस्वस्थ

English Summary: Now farmers will get interest-free loan up to 3 lakhs!
Published on: 19 July 2022, 03:17 IST