केंद्र सरकार आणि राज्य सरकार (state government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. यामधीलच एक योजना म्हणजे तारणकर्ज योजना.
सध्याची परिस्थिती पाहिली तर शेतकरी आपला शेतीमाल कमी पैशात विक्री करण्यास बाजारात घेऊन जातो. मागणी आणि पुरवठ्यानुसार शेतीमालाला दर मिळतो. अशावेळी शेतकऱ्यांना तारण कर्ज योजनेचा फायदा होऊ शकतो, तो कसा? याविषयी जाणून घेऊया.
उपमहाव्यवस्थापक रामेंद्रकुमार जोशी यांनी सुचविलेल्या पर्यायानुसार शेतकऱ्यांनी शेतीमाल तारण कर्ज (Taaran Debt) योजनेचा लाभ घेऊन त्यांचा शेतीमाल वखार महामंडळाच्या गोदामात ठेवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
ज्वारी-बाजरी आणि इतर तृणधान्यांसाठी देशात 3 केंद्रे स्थापन; शेतकऱ्यांना होणार फायदा
ऑनलाइन तारण कर्ज योजनेसाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा (Blockchain technology) वापर महामंडळाच्या गोदामात साठवणुकीस ठेवण्यात येणाऱ्या शेतीमालाच्या वखार पावतीवर ऑनलाइन तत्काळ कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे शेतकरी व ठेवीदार यांची वेळेची बचत होऊन कागदपत्रांसाठीच्या प्रवास खर्चात बचत होण्यास मदत होते.
वखार महामंडळ व राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी (farmers) व शेतकरी उत्पादक कंपनीकरिता अभिनव ऑनलाइन तारण कर्ज योजना ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून राबविण्यात येत आहे.
शरीरासोबत मनाचंही आरोग्य उत्तम ठेवायचं आहे? तर लक्षात ठेवा फक्त ४ सूत्रं
शेतीमाल सुरक्षित राहणार
याअंतर्गत पात्र शेतकरी किंवा शेतकरी उत्पादक कंपनी यांना वखार पावतीवरील शेतीमालाचे किमतीच्या ७० टक्के कर्ज बँकेकडून संबंधितांच्या खात्यात आरटीजीएस अथवा एनईएफटीद्वारे जमा करण्यात येते.
तारण कर्जाचा (mortgage loan) व्याज दर ९ टक्के असून, इतर बँकांच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. राज्य वखार महामंडळाने शेतीसाठी लागणारे बी-बियाणे, किटकनाशके यांची शास्त्रोक्त पद्धतीने सुरक्षित साठवणूक करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या
सरकारच्या 'या' योजनेत 1 लाख रूपयांचे होतील 5 लाख रुपये; एकदा गुंतवणूक करून पहाच
शेतकऱ्यांना 25 टक्के वाढीव नुकसान भरपाई मिळणार; सरकारकडून अधिसूचना जारी
पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटली; भाज्यांच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ
Published on: 19 September 2022, 04:25 IST