Government Schemes

LIC द्वारे ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. आज आपण अशाच एका सरकारी योजनेबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दररोज फक्त 29 रुपये गुंतवून 4 लाख रुपये मिळवू शकता

Updated on 31 August, 2022 2:35 PM IST

LIC द्वारे ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या योजना चालवल्या जातात. आज आपण अशाच एका सरकारी योजनेबद्दल (Government scheme) माहिती घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही दररोज फक्त 29 रुपये गुंतवून 4 लाख रुपये मिळवू शकता.

या योजनेचे नाव LIC आधार शिला आहे. एलआयसी पॉलिसी (LIC policy) अंतर्गत, 8 वर्षे ते 55 वर्षे वयोगटातील महिला यामध्ये गुंतवणूक करू शकतात. LIC च्या आधार शिला प्लॅनच्या ग्राहकांना चांगला परतावा देखील मिळतो. या योजनेअंतर्गत पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरही कुटुंबाला पैसे मिळतात.

पोस्ट ऑफिसच्या योजनेतील गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; सरकार व्याजदरात करणार मोठी वाढ

पॉलिसीची वैशिष्ट्ये

1) एलआयसी आधार शिला योजना (Aadhaar Shila Scheme) खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे.
2) पॉलिसीची किमान मुदत 10 वर्षे आणि कमाल 20 वर्षे आहे.
3) योजनेतील मॅच्युरिटीचे कमाल वय ७० वर्षे आहे.
4) पॉलिसी घेतल्यानंतर 5 वर्षांनी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास मॅच्युरिटीवर लॉयल्टी अॅडिशनची सुविधाही दिली जाते.
5) पॉलिसीच्या मुदतीच्या शेवटी एकरकमी रक्कम देखील दिली जाते.
6) या प्लॅनमध्ये तुम्ही किमान ७५००० रुपये आणि कमाल ३ लाख रुपये गुंतवू शकता.
7) या योजनेचा प्रीमियम भरणा मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर केला जातो.

शेतकऱ्यांनो सावधान! उसावरील विषारी अळी जीवाला पोहचवतेय हानी

4 लाख रुपये असे मिळवा

समजा वयाच्या ३० व्या वर्षी तुम्ही या योजनेत सलग २० वर्षे दररोज २९ रुपये जमा केले असतील आणि पहिल्या वर्षी तुम्ही एकूण १०,९५९ रुपये जमा केले असतील. आता त्यावर 4.5 टक्के दराने कर आकारला जाईल.

पुढील वर्षी तुम्हाला त्यात 10,723 रुपये द्यावे लागतील. अशाप्रकारे, तुम्ही हे प्रीमियम प्रत्येक महिना, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर जमा करू शकता. तुम्हाला 20 वर्षात 2,14,696 रुपये जमा करावे लागतील आणि मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण 3,97,000 रुपये मिळतील.

महत्वाच्या बातम्या 
शेतकरी मित्रांनो वेस्ट डीकंपोजरने तुमचे उत्पन्न वाढणार; फक्त 'या' पद्धतींचा करा वापर
जनावरांमधील कासदाह आजारामुळे दूध उत्पादनात होतेय घट; करा घरीच 'या' उपाययोजना
शेतकरी मित्रांनो आता घराच्या छतावरच तयार करा वीज; सरकार देतंय 50 हजारांपर्यंत अनुदान

English Summary: LIC plan proving profitable 4 Lakhs investment
Published on: 31 August 2022, 02:30 IST