दिवसेंदिवस शेतकऱ्यांची परिस्थिती बिघडत चालली आहे. अनेकदा अगदी हातातोंडाला आलेला घास अवकाळी पावसामुळे हिसकावला जातो. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. असे असताना आता या शेतकऱ्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक सुखद धक्का दिला आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांना 50 हजार रुपये हे प्रोत्साहनपर तर दिलेच जाणार आहे पण अशा शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले तर ते भरपाईसाठी देखील पात्र राहणार आहेत.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जे शेतकरी घेतलेल्या कर्जाची (Regular repayment) नियमित परतफेड करीत होते त्यांना (Heavy Rain) अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळेलच असे नव्हते. यामुळे या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत होता. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली प्रोत्साहनपर रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे हे म्हणाले आहेत.
तसेच अशाप्रकारचा अध्यादेश काढण्याच्याही सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी आ. प्रकाश आबिटकर आणि खा. धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज योजनेचा लाभ घेतला आहे. त्यापैकी काही शेतकरी हे नियमित कर्ज अदा करीत आहेत.
उपवास करणाऱ्यांना कोरोना होत नाही, संधोधनातून आली महत्वाची माहिती
त्यांनाच अतिवृष्टीने नुकासन झाले तर भरपाई नाही अशी नियमावली होती. पीक कर्जाचा लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी नियमित कर्ज अदा करण्यावर भर दिलेला आहे. मात्र महात्मा फुले कर्जमाफी योजनेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने जाचक नियम लावलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते.
महत्वाच्या बातम्या;
'स्वाभिमानी मिळवून देणार शेतकऱ्यांना ५० हजार, पूर असेल तर पोहत येऊन मोर्चात सहभागी व्हा'
धक्कादायक! मगरीने आठ वर्षांच्या मुलाला गिळले, पोटात मुलगा जिवंत असेल म्हणून..
लेट पण थेट! दमदार पावसामुळे खडकवासला धरण 100 टक्के भरले, पाण्याचा विसर्ग वाढवला
Published on: 12 July 2022, 05:40 IST