केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी तसेच व्यावसायिक तरुणांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून आर्थिक लाभ मिळेल. सरकारने तरुणांसाठी अशीच एक महत्वाची योजना (Scheme) सुरु केली आहे.
फक्त नोकरीवर अवलंबून न राहता तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे १० हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची योजना जाहीर केली आहे.
व्यवसायासाठी इच्छुक तरुणांना या योजनेचा मोठा लाभ मिळू शकतो. सरकारच्या या कर्जयोजनेमुळे तरुणांना फायदा होऊ शकतो.
दिलासादायक! 2 हजार 552 पशुपालकांच्या खात्यावर 6 कोटी रुपयांची रक्कम जमा
काय आहे योजना ?
ही योजना मराठा समाजातील तरुणांसाठी (youth Maratha community) आहे. या योजनेकरिता १० हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम तरुणांना व्यवसायासाठी कर्जापोटी मिळेल. विशेष म्हणजे या योजनेसाठी देण्यात येणाऱ्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.
आधी दहा हजार, ५० हजार, नंतर १ लाख
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांना सर्वप्रथम १० हजार रुपयांचे कर्ज देण्यात येणार आहे. कर्जापोटी देण्यात येणाऱ्या रकमेचा वापर त्यांनी कसा केला आहे. हे तपासतानाच त्या कर्जाची परतफेड नियमित केली असेल तर पुढच्या टप्प्यांत त्यांना ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम कर्जापोटी मिळेल.
या ५० हजार रुपयांच्या कर्जाचीदेखील नियमित कर्जफेड (Regular loan payments) केली तर त्यापुढील टप्प्यांत या तरुणांना एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम कर्जापोटी मिळू शकेल.
कागदपत्रे
आधार कार्ड
रहिवासी पुरावा
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
परतफेड प्रतिदिन १० रुपये
सावधान! आरोग्य विमा घेताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा होईल आर्थिक नुकसान
अटी आणि शर्ती
१) जेव्हा तरुणांना सर्वप्रथम १० हजार रुपयांचे कर्ज मिळेल, तेव्हा या कर्जाची परतफेड प्रति दिन १० रुपये याप्रमाणे करावी लागेल.
२) ५० हजार रुपये इतकी होईल, त्यावेळी या तरुणांना कर्जाची परतफेड प्रतिदिन ५० रुपये याप्रमाणे करावी लागणार.
३) ५० हजार रुपयांवरून जेव्हा कर्जाची मर्यादा एक लाख रुपये इतकी वाढेल, त्यावेळी कर्जाची परतफेड करताना या तरुणांना प्रतिदिन १०० रुपये याप्रमाणे परतफेड करावी लागेल. यासाठी वयोमर्यादा ६० वर्षे करण्यात आलेली आहे.
अर्ज कुठे करायचा
या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकता.
महत्वाच्या बातम्या
सावधान! हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर देतं रेड अलर्ट; वेळीच घ्या काळजी
अतिवृष्टीचा तब्बल 29 लाख शेतकऱ्यांना मोठा फटका; शेतकरी नुकसान भरपाई मदतीच्या प्रतीक्षेत
काय सांगता! या झाडाची साल, लाकूड, पाने विकून शेतकरी कमवू शकतात लाखों रुपये; वाचा...
Published on: 31 October 2022, 02:52 IST