सध्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना डिसेंबर २०१८ मध्ये सुरु केली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
या योजनेचा प्रत्येक वर्षी कोट्यवधी शेतकरी लाभ घेतात. जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. यामुळे आता तुम्हाला याचा अधिक लाभ मिळणार आहे.
या योजनेत एक महत्त्वाचा बदल होणार आहे. प्रत्येक वर्षी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात ६००० रुपये जमा केले जातात. २००० हजार रुपयांच्या तीन हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होते. परंतु आता या योजनेत एक हप्ता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पिकविम्याच्या मदतीसाठी आता 92 तास मुदत करणार, केंद्राकडे पाठपुरावा करणार, कृषीमंत्र्यांची माहिती
जर असे झाले तर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला ८००० रुपये जमा होतील. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात याविषयी चर्चा सुरु होती. सरकार फेब्रुवारी २०२३ पासून जादा हप्त्याची तरतूद करू शकते, असा दावा केला जात होता.
केंद्रीय अर्थसंकल्पात याविषयी घोषणा केली जाणार होती. लवकरच लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या योजनेत बदल होऊ शकतात. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात आता खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालये, राज्य सरकारचा निर्णय...
सासवडमध्ये ज्वारीला उच्चांकी ६३११ रुपये दर, शेतकऱ्यांना दिलासा...
या फुलाची लागवड करून शेतकरी होत आहेत श्रीमंत, जाणून घ्या कशी केली जाते लागवड
Published on: 31 July 2023, 04:09 IST