Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. आपण पाहिले तर सध्या शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अनुदानित दराने बियाणे देण्यात येत आहेत.

Updated on 26 September, 2022 3:30 PM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. आपण पाहिले तर सध्या शेतकऱ्यांचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा (National Food Security) अभियानांतर्गत अनुदानित दराने बियाणे देण्यात येत आहेत.

अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्यल्प, अल्प भूधारकांनी 'महाडीबीटी'वर (mahadbt)अर्ज करावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (Agricultural Officer) आरीफ शहा यांनी केले आहे. पीक प्रात्यक्षिकांतर्गत हरभरा, रब्बी ज्वारी, करडई या बियाण्यांवर अनुदान मिळणार आहे.

शेतकऱ्यांना (farmers) चांगले बियाणे मिळावे, अनुदानावर उपलब्ध व्हावे तसेच कडधान्य, तृणधान्य पिकांच्या नवीन वाणाचा प्रसार व्हावा यासाठी शेतकऱ्यांसाठी अभियान राबविले जात आहे.

शेतकऱ्यांनो रब्बी कांदा लागवड करताना 'या' पद्धतीचा वापर करा; होईल चांगली कमाई

बियाण्यांना मिळणार इतके अनुदान

हरभरा पिकांच्या (gram crop) १० वर्षांच्या आतील वाणास २५ रुपये प्रतिकिलो तर रब्बी ज्वारी पिकाच्या १० वर्षांवरील वाणास १५ रुपये प्रतिकिलो अनुदानीत दराने बियाणे देण्यात येत आहे. महाबीज, कृभको, राबिनी अमरावती, 'केव्हीके'मार्फत त्यांच्या अधिकृत वितरकांद्वारे तालुकानिहाय हरभरा व ज्वारी पिकाचे बियाणे वितरण करण्यात येत आहे.

भारीच की! ही एकच भाजी सर्व आजारांवर करतेय मात; एकदा खाऊन पहाच...

अनुदानावर पीक प्रात्यक्षिकाचा लाभ

हरभरा, रब्बी ज्वारी, करडई पिकांसाठी या योजनेत पीक प्रात्यक्षिकातंर्गत, महाडीबीटीवर (mahadbt) अर्ज केला तर एका गावातील लॉटरीमध्ये निवड झालेल्या २५ शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर पीक प्रात्यक्षिकाचा लाभ दिला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या 
घरसबसल्या सुरू करा 'हा' व्यवसाय; महिन्याला होईल 5 लाख रुपयांची कमाई
LIC ची भन्नाट योजना; फक्त 2 हजारांच्या गुंतवणुकीवर मिळणार 48 लाख रुपयांचा परतावा
शेतकऱ्यांसाठी खास योजना; आता पोस्ट ऑफिसच्या किसान विकास योजनेत शेतकऱ्यांचा पैसा होणार डबल

English Summary: Good news farmers subsidy available gram sorghum safflower seeds
Published on: 26 September 2022, 03:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)