केंद्र व राज्य सरकार (central and state government) शेतकऱ्यांसाठी तसेच व्यावसायिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. मात्र आता सरकारने शेततळेबाबद देखील एक दिलासादायक निर्णय घेतला आहे.
पाणीटंचाईच्या काळात शेततळे महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामुळे शासनाने शेततळे (farms) बांधण्यासाठी 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे.
शेतातील तळ्यात पाण्याचा सुरक्षित साठा उपलब्ध होतो. साठवलेले पाणी झिरपून जाऊ नये, तसेच टंचाईच्या काळात फळबागा (Orchard) वाचविण्यासाठी या पाण्याचा वापर व्हावा या हेतूने अनुदान दिले जाणार आहे.
शेततळे बांधण्यासाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार २८ हजारांपासून ते ७५ हजार रुपयांपर्यंत तळ्याच्या आकारानुसार शेततळे बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे.
देशातील प्रथम शेती अवजाराचे ग्रीन सिस्टिम शोरूम बार्शीत सुरू, शेतकऱ्यांना होणार फायदा
अनुदानाचे वाटप अशाप्रकारे केले जाणार
१५ × १५ × ३ मीटरच्या अस्तरीकरणासाठी २८,२७५ रुपये
२० × १५ × ३ मीटरसाठी ३१,५९८ रुपये
२० × २० × ३ मीटरसाठी ४१,२१८ रुपये
२५ × २० × ३ मीटरसाठी ४९,६७१ रुपये
२५ × २५ × ३ मीटरसाठी ५८,७०० रुपये
३० × २५ × ३ मीटरसाठी ६७,७२८ रुपये
३० × ३० × ३ मीटरसाठी ७५ हजार रुपये.
सरकार शेतकऱ्यांना देतंय वार्षिक 36 हजार रुपये पेन्शन; तुम्ही सुद्धा 'या' योजनेचे होऊ शकता लाभार्थी
फलोत्पादन क्षेत्रासाठी पावणेदोन लाख रुपये अनुदान
विशेष म्हणजे सामूहिक शेततळ्यासाठी १०० टक्के अनुदान मिळेल. ३४ × ३४ × ४.७० मीटर आकारमान असलेल्या सामूहिक शेततळ्यावर जर दोन ते ५ हेक्टरपर्यंत किंवा त्यापेक्षा जादा फलोत्पादन क्षेत्र असल्यास त्यासाठी तीन लाख ३९ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळेल.
मात्र फलोत्पादन क्षेत्र एक ते दोन हेक्टरच्या दरम्यान असल्यास २४ × २४ × ४ मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी पावणेदोन लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. म्हणजे जवळपास 2 लाखांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.
याठिकाणी अर्ज करा
या योजनांचा लाभ घेण्यासाठी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शेतकरी थेट ऑनलाइन अर्ज (Online application) करू शकतात. योजनांबाबत माहिती हवी असल्यास कोणत्याही कृषी सहायक, पर्यवेक्षक किंवा कृषी कार्यालयाशी तुम्ही संपर्क करू शकता. तळ्याच्या आकारानुसार अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात (bank account) वर्ग करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
पीकविमा योजनेअंतर्गत 'माझी पॉलिसी माझ्या हातात' उपक्रम सुरू; शेतकऱ्यांना होणार फायदा
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; गॅस सिलिंडर झाला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त
एकाच दिवशी वाढलेल्या संपत्तीमुळे अदानी वरच्या क्रमांकावर गेले, आकडा वाचून डोळे होतील पांढरे
Published on: 01 September 2022, 11:21 IST