शेतकऱ्यांचे उत्पन्न (Income of farmers) वाढविण्यासाठी सरकारकडून सिंचनाच्या सोयीवर भर दिला जातो. यासाठी शासनाकडून "मागेल त्याला विहीर" ही योजना देखील राबविली जाते. या योजनेविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
माहितीनुसार पूर्वी या योजनेंतर्गत (scheme) विहिरीच्या बांधकामासाठी 2 लाख 99 हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते. मात्र, आता या योजनेच्या अनुदानात शासनाने 26 हजारांची वाढ केली आहे. मागेल त्याला विहीर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता 3 लाख 25 हजार रुपयांचे अनुदान (grant) दिले जाणार आहे.
LIC ची 'ही' योजना खूपच खास; फक्त एकाच गुंतवणुकीवर मिळणार दरमहा 15 हजारांपर्यंत रक्कम
वाढीव निधीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मागेल त्याला सिंचन विहीर योजनेसोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा क्रांती योजना देखील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याची आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकरी घेऊ शकतात.
आनंदाची बातमी! तब्बल पावणेदोन लाख शेतकऱ्यांना मिळाली पीक विम्याची भरपाई
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने विविध समाज घटकांतील शेतकऱ्यांसाठी 'मागेल त्याला विहीर' ही योजना सुरू केली. मागेल त्याला विहीर ही योजना शासनाने कृषी विभागाच्या (Department of Agriculture) माध्यमातून सुरू केली आहे.
साहित्याचा वाढता खर्च, मजुरी लक्षात घेता या अनुदानात (scheme) 3 लाख रुपयांमद्धे वाढ करून 3 लाख 25 हजार रुपये करण्यात आले आहे. मागेल त्याला विहीर या योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका स्तरावरील कार्यालयाशी संपर्क करावा. व यानंतर सर्व प्रश्नांचे निरासरन झाल्यास अर्ज करावा.
महत्वाच्या बातम्या
दिलासादायक! सोयाबीन, कांद्याच्या भावात सुधारणा; जाणून घ्या बाजारभाव
रोपवाटिका अनुदानात वाढ! राज्य सरकारकडून मिळणार पावणे तीन लाख रुपयांपर्यंत अनुदान
'या' राशीच्या लोकांसाठी आजचा भाग्याचा दिवस; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
Published on: 17 October 2022, 11:18 IST