नियमित पीक कर्ज (crops loan) भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य शासन प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे. यासाठी पोर्टलवर माहिती भरली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार आहे.
जवळपास दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना (farmers) लाभ होऊन सुमारे ९०० कोटी रुपयांचा लाभ मिळू शकतो. नियमीत कर्जफेड आणि दोन लाखांवर पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही मदतीची घोषणा केली होती. या योजनेला महात्मा फुले कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आलेले.
आताच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे नियमीत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षातील तीनपैकी दोनवर्षे शेतकरी थकबाकीदार नसावा अशी अट आहे. तरच ५० हजारांपर्यंत हा लाभ मिळणार आहे.
सोयाबीनला मिळतोय कवडीमोल दर; आजही विकला जातोय 'या' दराने
एखाद्या शेतकऱ्यांचे नियमीत पीक कर्ज २५ हजार असेल तर त्याला तेवढीच रक्कम मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार (adhaar) लिंकिंग नाही, त्यांना लाभ दिला जाणार नाही. विशेष म्हणजे नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे.
तुम्हालाही आर्थिक तणाव जाणवत आहे? तर महत्वाच्या टिप्स करा फॉलो
त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या या कर्ज योजनेचा लाभ होईल. पात्र शेतकऱ्यांनी थंब इंम्प्रेशन (Thumb impression) केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना लवकरच लाभ मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी उद्योजक बनण्याची मोठी संधी; 35% अनुदानावर घरबसल्या सुरू करा 'हे' व्यवसाय
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याची कमाल; 'रेड बनाना' केळीचा प्रयोग यशस्वी, मिळतोय उच्चांक दर
शेतकऱ्यांनो चांगल्या उत्पादनासाठी 'या' खताचा करा वापर; होणार लाखोंमध्ये कमाई
Published on: 08 September 2022, 03:32 IST