Government Schemes

केंद्र सरकारच्या विविध प्रकारच्या योजना आहेत. त्यापैकी स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने गोबरधन योजना राबवण्यात येत असून यासाठी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसुल या गावाची निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक स्तरावर या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असून या संबंधीची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांनी दिली.

Updated on 05 September, 2022 6:56 PM IST

 केंद्र सरकारच्या विविध प्रकारच्या योजना आहेत. त्यापैकी स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने गोबरधन योजना राबवण्यात येत असून यासाठी नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील अंदरसुल या गावाची निवड करण्यात आली आहे. सार्वजनिक स्तरावर या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असून या संबंधीची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांनी दिली.

विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प असून  येत्या सहा महिन्यात हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार आहे व यासाठी शासनाकडून 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापना सोबतच स्वच्छतेच्या विविध घटकांवर काम करण्यात येत आहे.या योजनेच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यातील एका गावात ही योजना किंवा प्रकल्प राबविण्याचे निर्देश आहेत.

नक्की वाचा:Loan: व्यवसाय सुरू करण्यासाठी मुद्रा योजना ठरते एक आशेचा किरण,जाणून घेऊ थोडक्यात माहिती

काय आहे या योजनेचे स्वरुप?

 यामध्ये प्रामुख्याने शेती मधील कचरा तसेच सेंद्रिय कचरा, गुरांचा चारा म्हणजेच कचरा आणि गोशाळे पासून घरगुती वापर गॅसची निर्मिती या माध्यमातून करण्यात येणार असून या प्रकल्पांतर्गत तयार होणारा गॅसचा वापर गावातील कुटुंब,शाळा आणि अंगणवाड्यांसाठी करण्यात येणार आहे.

एवढेच नाही तर यातून निर्माण होणाऱ्या स्लरीचा उपयोग शेतीसाठी खत म्हणून करण्यात येणार आहे. यामध्ये गावाची लोकसंख्या तसेच गावातील जनावरांची संख्या व शेतीत निर्माण होणारा कचरा या निकषांवर गावांची निवड करण्यात येते व याच निकषांवर नाशिक जिल्ह्यातील अंदरसुल या गावाची निवड करण्यात आली आहे.

नक्की वाचा:PM Kisan: प्रतीक्षा संपली! या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 12 व्या हफ्त्याचे 2000 हजार रुपये

त्यासाठीचे गावाचे सर्वेक्षण व आराखडा व अंदाजपत्रकाचे काम पूर्ण करण्यासाठी तांत्रिक संस्थेची मदत घेण्यात आली असून यानंतर ई-टेंडर करण्यात आले होते.

यामध्ये गावातील नागरिकांचे जीवनमान सुधारावे यासाठी गुरांचा कचरा, स्वयंपाक घरातील कचरा तसेच पिकांचे अवशेष आणि बाजारातील कचऱ्यासोबतच जैव कचराचे रूपांतर करून गाव स्वच्छतेसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. गावात चांगल्या पद्धतीची स्वच्छता आणि आरोग्य या माध्यमातून या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना होणार आहे.

तसेच घनकचरा व्यवस्थापन व ग्रामीण भागातील जनतेचे उत्पन्न व रोजगार वाढविण्यासाठी व पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी व्हावेत या पद्धतीचे उद्दिष्ट या योजनेचे आहेत.

गावातील कचरा कमी करून गावाच्या स्वच्छतेचा जो काही स्तर आहे तो उंचावणे तसेच सेंद्रिय खतापासून बायोगॅस प्रकल्पातील शिल्लक स्लरीचा उच्च दर्जाचे खत हे रासायनिक खताला पर्याय म्हणून शेतीला उपलब्ध करून देणे तसेच साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून मलेरिया व अस्वच्छतेपासून निर्माण होणाऱ्या रोगांचे निर्मूलन करणे हे देखील महत्वाचे उद्दिष्ट आहे.

नक्की वाचा:गोबरगॅसवर शेतकऱ्यांना दिले जाते 'इतके' अनुदान; घ्या असा लाभ

English Summary: gobardhan scheme is important for village cleanness and give employment to farmer
Published on: 05 September 2022, 06:56 IST