Government Schemes

केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी अनेकांनी याचा गैरमार्गाने लाभ घेतला आहे. यामुळे आता सरकारकडून वसुली केली जात आहे. केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा मिळत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये मिळतात.

Updated on 20 July, 2022 12:54 PM IST

केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी अनेकांनी याचा गैरमार्गाने लाभ घेतला आहे. यामुळे आता सरकारकडून वसुली केली जात आहे. केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात फायदा मिळत आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षभरात सहा हजार रुपये मिळतात.

असे असताना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकांनी खोटी माहिती दिली आहे. यामुळे या लोकांना याचा फटका बसणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक वेळा शेतकरी चुकीची माहिती कागदपत्रे देतात. यामध्ये पती-पत्नी दोघेही योजनेचा लाभ घेत आहेत, तसेच लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतरही कुटुंबातील सदस्य योजनेचा लाभ घेत आहेत. याबाबत आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

अशांना आता शासन नियमांनुसार दिलेल्या रकमेच्या वसुलीसह शिक्षा देखील देऊ शकते. सरकारने आता कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या कृषी गरजा पूर्ण करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या किसान सन्मान योजनेमध्ये दुर्बल घटकातील शेतकऱ्यांना त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे, रेशनकार्ड आणि शेतीच्या कागदपत्रांच्या आधारे लाभ दिला जातो. यामुळे त्यांना लाभ मिळतो.

शेतकऱ्यांनो आता पॉलिहाऊसचा खर्च वाचणार, प्लॅस्टिक बोगद्याची शेती ठरतेय फायदेशीर, जाणून घ्या..

दरम्यान, आता उत्तर प्रदेशसह काही राज्यांमध्ये लाभार्थ्यांच्या पडताळणीचे काम सुरू करण्यात आले आहे. पडताळणीमध्ये असे लाभार्थी शेतकरी उघड झाले की जे हयात नाहीत आणि त्यांच्या खात्यात रक्कम पोहोचत आहे. अशांना त्यांच्या कुटुंबीयांना पैसे वसुलीच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. यामुळे ही रक्कम आता वसूल केली जाणार आहे. हा आकडा देखील मोठा आहे.

लाखो रुपये कमवून देणारं पावसाळ्यातील हक्काचे पीक, जाणून घ्या तिळाची लागवड

कुटुंबातील लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाला असल्यास, तहसील अधिकारी व संबंधित बँकेकडे मृत्यू पुरावा सादर करून योजनेतून माघार घ्यावी. असा नियम आहे. तसेच इतरही अनेक नियम आहेत. मात्र हे नियम न बघता अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे आता त्यांच्याकडून हे पैसे वसूल केले जाणार आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या;
काय सांगता! आता मोबाईल अ‍ॅपवर करा जनावरांची विक्री, दुधाचे प्रमाणही समजणार
दिवसाला 20 ते 30 लिटर दूध देणाऱ्या म्हशी, शेतकऱ्यांनो कष्टाचा घ्या मोबदला, वाचा सविस्तर..
आता एकाच झाडावर टोमॅटो, वांगी, बटाटे, शास्त्रज्ञांनी केली शेतीमध्ये क्रांती

English Summary: give wrong information Modi 2 thousand punished
Published on: 20 July 2022, 12:54 IST