समाजातील प्रत्येक घटकाला विविध लाभ देण्याच्या दृष्टिकोनातून तसेच या घटकांचे जीवन जगणे सुकर व्हावे, याकरिता केंद्र सरकार व राज्य सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात.
या योजनांमध्ये एका योजनेला लागुन बऱ्याच प्रकारचे फायदे दिले जातात. फक्त आवश्यकता असते ती या योजनांबद्दल पुरेशी माहिती असण्याची व वेळेवर या योजनांचा लाभ उठवण्याची. अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेबद्दल या लेखात आपण माहिती घेणार आहोत.
ई श्रम कार्ड योजना
समाजामध्ये विविध असंघटित क्षेत्रामध्ये बरेच कामगार काम करतात. परंतु अशा कामगारांची माहिती सरकारकडे नाही. त्यामुळे अशा कामगारांचा माहिती सरकारला व्हावी यासाठी अशा कामगारांचा डेटाबेस तयार करण्यासाठी सरकार अनेक योजना सुरू केली आहे.
पण ही योजना सुरू केल्यानंतर सरकारने अनेक योजनांची या योजनेला जोडले. या योजनेचा मुळातच उद्देश आहे की, असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांचा एक डेटा पूर्ण गोळा करून अशा कामगारांना सरकारी योजनांचा लाभ देणे आहे. या कार्ड च्या माध्यमातून तुम्ही कामगार विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ तुम्ही या माध्यमातून मिळू शकतात.
एवढेच नाही तर तुम्ही जे काही काम करतात त्या कामाला लागणारे आवश्यक साधने तुम्हाला मोफत या कार्ड च्या माध्यमातून मिळतात. येणारा भविष्यकाळात रेशन कार्ड या ई श्रम कार्ड ला जोडले जाण्याची शक्यता असल्यामुळ तुम्हाला वन नेशन वन रेशन या योजनेचा लाभ देखील घेता येऊ शकतो. तुम्हाला भविष्यामध्ये पेन्शन सुविधादेखील दिली जाऊ शकते.
या कार्डच्या माध्यमातून दोन लाखांचे मोफत विमा संरक्षण
ई श्रम कार्ड मिळाल्यानंतर तुम्हाला दोन लाख रुपयांचे मोफत विमा संरक्षण दिले जाते. या विम्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रीमियम भरावा लागत नाही. या अंतर्गत कामगाराचा अपघाती मृत्यू झाला तर त्याच्या वारसास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत दोन लाख रुपये दिले जातात व कामगार अपंग झाला तर अशा परिस्थितीमध्ये त्याला एक लाख रुपये मिळतात.
हे कार्ड कोणाला मिळते?
असंघटित क्षेत्रात काम करणार्या कोणत्याही कामगाराला ई श्रम कार्ड बनवता येते. जर यामध्ये कामाने रूप विचार केला तर मोलकरीण, सफाई कामगार, गार्ड, ब्युटी पार्लर कामगार, नावी, शिंपी, सुतार, प्लंबर व इलेक्ट्रिशियन यांचा समावेश होतो.
त्यासोबतच पेंटर, शेतमजूर, वेल्डर, वीट भट्टी कामगार, नरेगा कामगार, दगड तोडणारा, खदान कामगार, मूर्ती बनवणारा, मच्छिमार, हमाल, रिक्षा चालक, कोणत्याही प्रकारचे विक्रेते, चहा विक्रेता, भेळ विक्रेता, हॉटेलमधील वेटर, रिसेप्शनिस्ट, चौकशी कारकून, ऑपरेटर, ऑटो ड्रायव्हर्स, एखाद्या दुकानाचा सेल्समन आणि हेल्पर, ॲमेझॉन वर फ्लिपकार्ट डिलिव्हरी बॉय, नर्सेस, वार्ड बॉय, डेरी वाले, स्विगी डिलिव्हरी बॉय, मंदिराचे पुजारी, सर्व पशुपालक अशा बहुसंख्य क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जातो.
ई श्रम कार्ड मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1- अर्जदाराचे आधार कार्ड
2- बँक खात्याचा तपशील, पासबुकची प्रत
3- वीज बिलाची प्रत
4- रेशन कार्डची प्रत
5- आधार कार्ड लिंक मोबाईल क्रमांक
6- कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
7- अर्जदाराच्या रहिवासी प्रमाणपत्र
8- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
9- अर्जदाराचे वय प्रमाणपत्र
महत्वाचे
ई श्रम कार्ड पोर्टल वर नोंदणी करून तुम्ही हे कार्ड मिळू शकतात. तसेच सीएससी केंद्रावर ऑफलाइन नोंदणी देखील करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही हे पूर्णपणे मोफत आहे.
महत्वाच्या बातम्या
Published on: 23 May 2022, 12:27 IST