सरकार (government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यातून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. मात्र शेतकऱ्यांना अशा अनेक गोष्टींची माहिती नसते, ज्यातून त्यांना चांगला मोबदला मिळू शकतो.
अनेक वीज कंपन्या (Electricity companies) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वीज वाहून नेण्याचे काम करतात. यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात विजेचा टॉवर उभा केला जातो. याठिकाणच्या जमिनीत शेतकऱ्यांना शेतीही करता येत नाही.
शेतजमिनीवर टॉवर उभारल्यास किंवा जमिनीतून वीजवाहक (Conductors through the ground) तारा नेल्यास त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळू शकतो. या कायद्याविषयी शेतकऱ्यांना माहिती असणे गरजेचे आहे. कायदा नक्की काय आहे? टॉवर उभरल्यास कुठे अर्ज करावा? मोबदला किती मिळतो? याविषयी माहिती घेऊया.
सरकारच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह योजनेत जमा करा 500 रुपये आणि मिळवा 40 लाख रुपयांचा लाभ
कायदा
1 नोव्हेंबर 2010 रोजी महाराष्ट्र सरकारनं शासन निर्णय (Government decision) काढला. त्याअंतर्गत शेतजमिनीत 66 ते 765 के.व्ही. क्षमतेच्या पारेषण वाहिन्यांसाठी टॉवर उभारलं जात असेल, तर त्यासाठीच्या मोबदल्यासंदर्भात आदेश जारी केले.
त्यानुसार जमीन कोरडवाहू असेल तर टॉवरसाठी (tower) जेवढी काही जमीन व्यापण्यात आली तेवढ्या क्षेत्रफळासाठी त्या भागातील सरकारी बाजारभावाच्या 25 % मोबदला निश्चित करण्यात आला आहे. बागायती व फळबागांच्या जमिनीसाठी हा मोबदला रेडी रेकनरच्या 60% इतका निश्चित करण्यात आला.
शेतजमिनीत टॉवर उभारल्यास.
तुमच्या शेतात 66 ते 765 के.व्ही. क्षमतेच्या पारेषण वाहिन्यांसाठी टॉवर उभारण्यात आला असेल, तर सुरुवातीला टॉवरनं व्यापलेल्या जमिनीचं क्षेत्रफळ मोजलं जाईल. त्यानंतर त्या क्षेत्रफळासाठी तुमच्या भागातील रेडीरेकनर दराच्या दुप्पट मोबदला दिला जाईल.
मोबदल्याची ही रक्कम दोन समान टप्प्यात देण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील मोबदल्याची रक्कम ही टॉवरच्या पायाभरणीनंतर, तर दुसऱ्या टप्प्यातील मोबदला हा टॉवरचं काम पूर्ण झाल्यानंतर दिले जाते.
शेत जमिनीतून तारा जात असतील तर..
शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतात टॉवर उभारला नसेल आणि फक्त लाईनच्या तारा जात असतील, तर तेव्हाही तुम्हाला मोबदला मिळू शकतो. या तारांच्या लाईनच्या खाली जेवढी जमीन येते, त्या जमिनीसाठी मोबदला दिला जातो, असे शासन निर्णयात नमूद आहे.
या ठिकाणी करा अर्ज ?
ज्या व्यक्तीच्या शेतात आणि ज्या सर्व्हे नंबरमध्ये (Survey No) टॉवर उभारायचा असतो, त्या व्यक्तीला यासंबंधी आधी माहितीपर नोटीस दिली जाते. त्यानंतर मग 2017 सालच्या धोरणाप्रमाणे त्याला मोबदला दिला जातो. किंवा तुम्ही महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणच्या स्थानिक कार्यालयात देखील मोबदल्यासंदर्भात अर्ज करू शकते.
महत्वाच्या बातम्या
Goat Farming: शेळीच्या 'या' 4 जाती शेतकऱ्यांना मिळवून देतील चांगला नफा
Today Horoscope: सूर्य-शुक्र एकाच राशीत असल्यामुळे नशीब चमकण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
दिलासादायक! गोगलगायींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार 75 हजार रुपयांची मदत
Published on: 29 August 2022, 09:53 IST