शेतकऱ्यांसाठी (farmers) एक दिलासादायक बातमी आहे. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा जवळपास ३० हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (bank account) लवकरच निधी जमा केला जाणार आहे.
या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत निधी जमा केला जाणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय (Government decision ) शुक्रवारी (२९ जुलै) जारी करण्यात आला आहे.
शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Mahatma Jyotiba Phule Farmers Debt Relief Scheme) जाहीर केली होती. त्याअंतर्गत अल्प मुदतीच्या पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहनपर देण्याची घोषणा २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली होती.
हे ही वाचा
E-Crop App: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; ई-पीक पाहणीसाठी नवे 'अॅप' उपलब्ध
मात्र, कोविडच्या (covid) पृष्ठभूमीवर राज्याची आर्थिक घडी विस्कटल्याने आश्वासनाची पूर्तता झाली नव्हती. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी तरतुद करण्यात आली.
हे ही वाचा
Kisan Credit Card: काय सांगता! किसान क्रेडिट कार्डवर कमी व्याजात मिळणार कर्ज; जाणून घ्या व्याजदर
'या' शेतकऱ्यांना मिळणार लाभ
1) २०१८, २०१९, २०२० या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीककर्जापैकी दोन वर्ष नियमित व पूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार (benefits) आहे.
2) तसेच ५० हजारापेक्षा कमी अल्पमुदत पीककर्ज (crop loan) असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी २०१८ - १९ अथवा २०१९-२० या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या पीककर्जाच्या मुद्दल रक्कम इतका प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे.
3) यासह २०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व महापुरात झालेल्या नुकसानीमुळे कर्जमाफीचा लाभ घेतलेले व मृत शेतकऱ्याच्या वारसानी कर्जाची परतफेड केली अशा वारसदारांनाही योजनेचा (scheme) लाभ मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
Organic Foods: 'हा' व्यवसाय घरबसल्या सुरू करा; दरमहा मिळतील 50 हजार रुपये
Pest Management: शेतकरी मित्रांनो आता पिकांचे नुकसान टळणार; किडीचे करा असे व्यवस्थापन
भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; आता शेतकऱ्यांना घरबसल्या भरता येणार शेतीसंबंधीचे कर
Published on: 01 August 2022, 05:10 IST