Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. पीक विमा राबविण्यासाठी 1 जुलै 2022 रोजी शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली होती.

Updated on 20 October, 2022 11:38 AM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी (farmers) नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. पीक विमा (crop insurance) राबविण्यासाठी 1 जुलै 2022 रोजी शासन निर्णयानुसार मंजुरी देण्यात आली होती.

यासह या जिल्ह्यात हवामान हवामानामुळे 50 टक्के एवढे नुकसान झाले असेल तर पीक विमा कंपनीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील देण्यात आले होते. यानुसार महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांना ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

या जिल्ह्यांना मिळणार नुकसान भरपाई

आता सध्या पिकांच्या झालेल्या नुकसानीत पीक विमा कंपनीने १४ जिल्ह्यांना नुकसान भरपाई देण्याचे मंजूर केले आहे. त्यात चंद्रपूर (Chandrapur), गोंदिया (Gondia), जालना (Jalna), कोल्हापूर (Kolhapur) या ४ जिल्ह्यांना HDFC Arbo पीक विमा कंपनीकडून ही योजना राबवली जात आहे.

शेतकरी मित्रांनो गाय, म्हैस आणि शेळीच्या या जातींचं पालन करा; होईल मोठा फायदा

तसेच सोलापूर (Solapur), अमरावती , उस्मनाबाद, लातूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना AXA India अर्थात भारतीय कृषी विमा कंपनीकडून ही अधिसूचना काढण्यात आली आहे. तर परभणी (parbhani), वर्धा (Wardha), अकोला (Akola), नागपूर (Nagpur) या ४ जिल्ह्यांसाठी lCIC Lambord या पीक विमा कंपनीकडून ही योजना राबवली जात आहे.

सावधान! जेवल्यानंतर ताबडतोब झोपत असाल तर होऊ शकतात गंभीर आजार; वाचा सविस्तर

नांदेड (Nanded) जिल्ह्यासाठी United India या कंपनीकडून पीक विमा योजना राबवली जात आहे. ही पीक विमा योजनेची १४ जिल्ह्यात अधिसूचना काढण्यात आली असून यात १९१ तालुक्यातील शेतकरी यासाठी पात्र आहेत, तर ९४१ महामंडळासाठी ही सूचना लागू करण्यात आली आहे.

पिक विम्याचे वाटप कधी

या पीक विम्याचे वाटप हे येणाऱ्या एका आठवड्यात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यापर्यंत या पीक विमा (Crop Insurance) योजनेचे २ कोटी रुपयाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच याअगोदर ३ जिल्ह्यात या पीक विमा योजनेचे वाटप करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 
सावधान! मुंबईतून तब्बल 400 किलो भेसळयुक्त तूप जप्त; अन्न व औषधी विभागाने दिली माहिती
परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान; कृषी विभागाकडून सल्ला, तूर आणि भाजीपाला पिकांची घ्या 'अशी' काळजी
सावधान! या राशीच्या व्यक्तींची फसवणूक होण्याची शक्यता; जाणून घ्या आर्थिक राशीभविष्य

English Summary: farmers 14 districts compensation government decision issued
Published on: 20 October 2022, 11:33 IST