Government Schemes

शेतकऱ्यांसाठी (farmers) एक दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद शासनाकडे व्हावी या उद्देशाने राज्य सरकारकडून 'ई-पीक पाहणी' (E-Pik Pahani) हे ॲप काढले आहे.

Updated on 13 August, 2022 10:47 AM IST

शेतकऱ्यांसाठी (farmers) एक आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्याची नोंद शासनाकडे व्हावी या उद्देशाने राज्य सरकारकडून 'ई-पीक पाहणी' (E-Pik Pahani) हे ॲप काढले आहे.

आता शेतकऱ्यांना 'ई-पीक पाहणी' (E-Peak Inspection) व्हर्जन -2 हे मोबाईल ॲप डाउनलोड करून घ्यावे लागणार आहे. या ॲपवर ई पीक पाहणीची नोंद करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना या ॲप चा फायदा कसा होईल, हे आपण जाणून घेणार आहोत.

ॲप बाबत महत्वाचे बदल

1) 1 ऑगस्टपासून मोबाईल (E-Pik Pahani) ॲप बदलण्यात आले आहे.
2) शेतकऱ्यांना चार पिकांचा समावेश करता येणार आहे. यामध्ये एक मुख्य आणि तीन दुय्यम पिकांचा सहभाग राहणार आहे.
3) आधीचे ॲप बंद कऱण्यात आले असून शेतकऱ्यांना यंदा त्या संबंधित गटामध्येच जाऊन माहिती भरावी लागणार आहे.
4) शिवाय चुकीची माहिती अदा केली तर ॲप ते स्विकारत नाही.

Solar Pump: शेतकरी मित्रांनो 60 टक्के अनुदानावर सौलर पंप घरी आणा; जाणून घ्या प्रोसेस

नव्या ॲपची वैशिष्ट्ये

एक मुख्य आणि तीन दुय्यम पिकांचा समावेश करता येणार आहे. दुय्यम पिकांच्या लागवडीचा दिनांक हंगाम व क्षेत्र नोंदवण्याचीही (E-Pik Pahani) देखील सोय करण्यात आली आहे.

त्यामुळे दुय्यम पिकांची अचूक माहिती मिळण्यासही मदत होते. शिवाय शेतकऱ्यांना माहिती भरताना अडचणी निर्माण झाल्या तर त्याचे निराकरण करण्यास ॲपमध्येच बटन देण्यात आले आहे. जेणेकरुन नेहमी विचारले जाणारे प्रश्नांची उत्तरेही तिथे असणार आहेत.

नोंदवलेली माहिती जर चुकीची असेल तर शेतकऱ्यांना एकवेळ दुरुस्त करण्याची संधी असणार आहे. मात्र, दुसऱ्यांदा माहिती भरताना योग्य ती काळजी घ्यावीच लागणार आहे. शिवाय यासाठी कृषी सहायकांचे मार्गदर्शन घेणेही गरजेचे आहे.

Green Onion: टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये हिरवा कांदा पिकवा; होईल चांगले उत्पन्न

ऑडिओ क्लिप ची घेता येणार मदत

या मोबाईल ॲपमध्ये कायम पडिक क्षेत्र, बांधावरची झाडी, पिकांची माहिती, गावाची माहिती, गावाची पीक पाहणी इत्यादीची माहिती देणारे ऑडिओ क्लिप त्यामध्ये असणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती भरताना अडचणी निर्माण होणार नाही. शिवाय अडचणी निर्माण झाल्या तरी त्या सोडवायच्या कशा याचा फॉर्म्युलाही ॲपमध्येच (E-Pik Pahani) असणार आहे.

महत्वाच्या बातम्या 
Groundnut Crop: भुईमूग पिकावरील किडीचे करा असे नियंत्रण; मिळेल भरघोस उत्पन्न
Zero Budget Farming: झीरो बजेट शेतीमध्ये लाखोंचा नफा; पैसे खर्च न करता मिळणार बंपर उत्पादन
Beans Farming: बिन्स शेतीतून शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांचा निव्वळ नफा; जाणून घ्या सविस्तर

English Summary: E Crop Inspection major change New app launch
Published on: 13 August 2022, 10:24 IST