Government Schemes

केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतं. त्यामधील प्रधानमंत्री पीक विमा योजना ही एक आहे. या योजनेबाबद आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.आता शेतकरी पीक विमा योजनेची नोंदणी पोस्ट ऑफिसमध्ये करू शकणार आहेत.

Updated on 27 July, 2022 3:43 PM IST

केंद्र सरकार (Central Govt) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असतं. त्यामधील प्रधानमंत्री पीक विमा योजना (Pradhan Mantri Crop Insurance Scheme) ही एक आहे. या योजनेबाबद आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

आता शेतकरी पीक विमा योजनेची नोंदणी पोस्ट ऑफिसमध्ये करू शकणार आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै आहे. 31 तारखेच्या आता शेतकऱ्यांना पीक विमा नोंदणी करण्यास कृषी विभागाने (Department of Agriculture) सूचना दिल्या आहेत.

सर्व माहिती देऊन नोंदणी करणे गरजेचे असल्याचे म्हंटले आहे.सातारा जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांसाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये होणाऱ्या नुकसान भरपाई देण्यासाठी ही जाहीर करण्यात आली आहे.

हे ही वाचा 
LPG Subsidy: एलपीजी सबसिडीबाबत सरकारची जबरदस्त योजना; जाणून घ्या कोणाला मिळणार सबसिडी

मात्र दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना आता पीक विमा योजनेची नोंदणी जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिसमधून (post office) करता येणार आहे. याबाबतची माहिती सातारा मंडळ टपाल विभागाचे वरिष्ठ प्रवर अधीक्षक व्यंकटेश रेड्डी यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील 150 शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केल्याची माहिती देखील रेड्डी यांनी दिली आहे. व्यंकटेश रेड्डी पुढे बोलताना म्हणाले, प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी नोंदणी करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी बँक (bank) पासबुक, सात बारा, आधार कार्ड इत्यादी कागदपत्र सोबत असणे आवश्यक आहे.

Business: शेतकरी मित्रांनो 85 % अनुदानासह सुरू करा 'हा' व्यवसाय; पहा सरकारची जबरदस्त योजना

 

सातारा विभागीय कार्यक्षेत्रात 384 पोस्ट ऑफिस असून ही सुविधा शासकीय माफक दरामध्ये उपलब्ध आहे. विशेष म्हणजे याबरोबरच पोस्ट ऑफिस (post office) मध्ये सीएसटी प्लॅटफॉर्म मधून सर्व प्रकारची बिल, पेमेंट गॅस बुकिंग, विमान, रेल्वे बस तिकीट आरक्षण, पॅन कार्ड आवेदन, विमा पॉलिसी यासारख्या लागणाऱ्या सुविधा सुद्धा टपाल कार्यालयात उपलब्ध आहेत.

महत्वाच्या बातम्या 
Bank Holiday: ग्राहकांनो बँकेतील कामे आजच उरकून घ्या; ऑगस्टमध्ये 17 दिवस राहणार बँका बंद
Post Office Scheme: भारीच की! पोस्टाने आणली 'ही' जबरदस्त परतावा योजना; घ्या आजच लाभ
Agriculture Department: कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोठे आवाहन; शेतकरी मित्रांनो करा आजच 'हे' काम

English Summary: Crop insurance registration post office Relief farmers
Published on: 27 July 2022, 03:43 IST