Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो. आता पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियानासाठी आणखी एक महत्वपूर्णं निर्णय सरकारने घेतला आहे. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Updated on 04 October, 2022 10:02 AM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना (new scheme) राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होतो. आता पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियानासाठी आणखी एक महत्वपूर्णं निर्णय सरकारने घेतला आहे. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाअभियानासाठी (कुसूम टप्पा -२) राज्य सरकारने १५ कोटी २७ लाख ५४ हजार रुपयांचा निधी महाऊर्जाला देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

विशेष म्हणजे ही योजना राबविण्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यात जेथे वीज पोहोचली नाही. अशा ठिकाणी कृषी पंपांना सौर उर्जेद्वारे वीज देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. राज्यात जवळपास 1 लाख कृषी सौर पंप (Agriculture Solar Pump) बसविण्यात येणार आहेत.

महत्वाचे म्हणजे यापैकी १० टक्के हिस्सा राज्य सरकार (State Govt) भरणार आहे. ज्या ठिकाणी वीज गेलेली नाही अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना तीन एचपी, पाच एचपी आणि साडेसात अश्वशक्ती क्षमतेच्या सौर कृषिपंपांसाठी सौरऊर्जा वीज जोडणी देण्यात येते. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठी आहे.

खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ९० टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ९५ टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येते. राज्यात ही योजना राबविताना एक लाख पारेषण विरहित सौर कृषी पंप (Agricultural Pumps) मंजूर केले असून त्याची अंमलबजावणी महाऊर्जा करत आहे.

सामान्य गव्हापेक्षा काळ्या गव्हाची किंमत 4 पट जास्त; शेतकरी होणार मालामाल

५० हजार नग सौर कृषिपंप बसविण्यासाठी मान्यता

कुसूम नावाने ओळखल्या जाणाऱ्या या योजनेच्या अंमलबजावणीसाठी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत यंदाच्या आर्थिक वर्षात राज्यात ५० हजार नग सौर कृषिपंप (Agricultural Pumps) बसविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार १४ पुरवठादारांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत.

लाभार्थी निवड

या वर्षीच्या आर्थिक वर्षात या योजनेसाठी अर्थसंकल्पात १०९ कोटी ११ लाख इतका निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार १० टक्के शासन हिस्सा देण्यासाठी अर्थसंकल्पित निधीच्या १५ टक्केनुसार महाऊर्जाला १५ कोटी, २७ लाख ५४ हजार रुपये वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनो लवंग, वेलची 'या' मसाला पिकांची शेती करून कमवा लाखों रुपये; जाणून घ्या

कुसूम योजना (दुसरा टप्पा)

1) एकूण सौर कृषिपंप - एक लाख
2) यावर्षीच्या वर्षात मंजुरी - ५० हजार कृषीपंप
3) एकूण मंजुरी - १०९ कोटी ११ लाख
4) अर्थसंकल्पीय मंजुरीच्या १५ टक्के निधी - १५, २७ ५४

लाभार्थी शेतकरी

1) सर्वसाधारण गट - ८९१८
2) सामाजिक न्याय विभाग लाभार्थी - ६९६
3) आदिवासी विकास विभाग लाभार्थी - ४५१

महत्वाच्या बातम्या 
वृषभ, कर्क राशीच्या लोकांचा आजचा दिवस मौज मजेचा; जाणून घ्या संपूर्ण राशींचे राशीभाविष्यदिलासादायक! जेष्ठ नागरिकांसाठी 'या' बँकेने लाँच केली नवीन FD स्कीम; मिळणार तब्बल 8.40 % व्याज
शेतीकामासाठी सर्वोत्तम भारतातील टॉप 5 ट्रॅक्टर; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

English Summary: Comforting fund Rs 15 crore 27 lakh approved solar pump
Published on: 04 October 2022, 10:02 IST