तुम्ही स्वताचा व्यवसाय (Business) सुरू करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आपण एका उत्तम व्यवसायाची माहिती घेणार आहोत. हा व्यवसाय पोस्ट ऑफिस फ्रेंचायझीचा आहे.
पोस्ट ऑफिसच्या फ्रेंचायझीमध्ये (Franchise) तुम्ही फक्त 5 हजार रुपयांचा छोट्या गुंतवणूकीत चांगले पैसे कमवू शकता. देशात पोस्ट ऑफिसची (Post office) संख्या गरजेनुसार खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत सरकार पोस्ट ऑफिस फ्रँचायझींच्या माध्यमातून त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
अशा परिस्थितीत सरकारच्या या योजनेत सहभागी होऊन तुम्ही दरमहा भरपूर कमाई करू शकता. विशेष म्हणजे हा व्यवसाय तुम्ही घरी बसून करू शकता. पोस्ट ऑफिसच्या मदतीने तुम्ही दोन प्रकारच्या फ्रेंचायझी (Franchise) उघडू शकता.
या लोकांना आज मिळणार बाप्पाचा आशीर्वाद; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
पहिली फ्रँचायझी पोस्ट फ्रँचायझी आउटलेट (Post Franchise Outlets) आहे आणि दुसरी फ्रँचायझी पोस्टल एजंट आहे. ज्या ठिकाणी आधीपासून पोस्ट ऑफिस नाही, पोस्ट फ्रँचायझी आउटलेट उघडण्याची परवानगी देते. तर पोस्ट ऑफिस आधीच तिथल्या पोस्टल एजंटच्या फ्रँचायझीचे काम देते.
एलआयसी फक्त 100 रुपयांमध्ये देत आहे 75 हजार रुपयांचा नफा
फ्रँचायझीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
पोस्ट ऑफिस (post office) फ्रँचायझी मिळविण्यासाठी, तुमचे वय किमान १८ वर्षे असणे गरजेचे आहे. तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटला भेट देऊन आणि त्याच्या फ्रँचायझीसाठी फॉर्म डाउनलोड करून ते भरावे लागेल. त्यानंतर ते सबमिट करावे लागेल. यानंतर पोस्ट ऑफिस फॉर्म (post office form) निवडेल आणि त्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकाल.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; उडीदाचे भाव तेजीत, आता सरकारही करणार उडिदाची खरेदी
शेतकऱ्यांना मोठा फटका! बटाटा-टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या दर
सोयाबीनच्या बाजारभावात चढ की उतारा? वाचा आजचे सोयाबीनचे दर
Published on: 02 September 2022, 01:31 IST