गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी छत्तीसगड सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. आता याठिकाणी भूपेश बघेल सरकार गोमूत्र खरेदी करणार आहे. गोमूत्र खरेदीसाठी सरकारने संपूर्ण ब्ल्यू प्रिंट (Blue Print) तयार केली आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रस्तावाला भूपेश मंत्रिमंडळाने (Bhupesh Baghel)या योजनेला मंजुरी दिली आहे.
याबाबत आता सरकारकडून कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. 28 जुलैपासून ही योजना सुरु होणार आहे. सरकार 4 रुपये लिटर दराने गोमूत्र खरेदी करणार आहे. गोधन न्याय योजनेंतर्गत 2 रुपये किलोने शेण खरेदी केल्यानंतर सरकारची ही सर्वात महत्त्वाकांक्षी योजना असेल. यामुळे शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी माहिती दिली आहे.
ते म्हणाले, छत्तीसगड (Chhattisgarh) हे शेण खरेदी करणारे देशातील पहिले राज्य आहे. आता आम्ही गोमूत्रही खरेदी करणार आहोत. याचा मोठा फायदा शेतकरी आणि पशुपालकांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. लोकांनी घरात किंवा गोठ्यात जनावरे बांधून ठेवायला सुरुवात केली आहे. मूत्र खरेदीपासून मोकळ्या राहणाऱ्या गायींनाही बांधण्यात येणार आहेत, यामुळे रोडवर फिरणाऱ्या गाई देखील आता दिसणार नाहीत.
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची नवीन घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार बक्षीस म्हणून ५० हजार
तसेच आता त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू होईल. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात दोन ठिकाणाहून सुरुवात होणार आहे. पशुपालकांकडून गोमूत्र खरेदी केले जाणार असून त्यापासून सेंद्रिय कीटकनाशके तयार केली जाणार आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा हा छत्तीसगड सरकारचा हेतू आहे, गोपालकांना फायदा होईल, असा सरकारचा विश्वास आहे.
उद्यापासुन महागाई रडवणार, खाणं-पिणं आणि वैद्यकीय सेवाही महागणार
तसेच गौधन न्याय योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात शेणखत खरेदी करण्यात आले होते, ज्यापासून गांडूळ खत तयार केले जात होते. आणि आता सेंद्रिय कीटकनाशके बनवण्यासाठी गोमूत्राचा वापर केला जाणार आहे. यामुळे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळेल. यामुळे अनेक उद्देश यामुळे साध्य करता येणार आहेत. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतपंप चोरणारांच्या मुसक्या वालचंदनगर पोलिसांनी आवळल्या, सणसरमधून चोरट्यांना अटक
आता तुम्ही पगाराव्यतिरिक्त एक रुपयाही जास्त लपवू शकणार नाही, वाचा नवीन नियम..
आता हायगय करायची नाही! एकदा आमदार,आयुष्यभर पगार, राज्यात 653 माजी आमदार मंत्र्यांना निवृत्ती वेतन
Published on: 18 July 2022, 12:02 IST