2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार जेव्हा सत्तेत आले होते तेव्हा त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना जाहीर केली होती. या योजनेमध्ये अशी तरतूद होती की जे नियमितपणे कर्जफेड करणारे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 50 हजार रुपयांची मदत करण्यात येणार होती. परंतु मध्यंतरी कोरोना संकट आल्यामुळे ही योजना रखडली होती.
परंतु आता नवीन सरकारने शेतीतील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर अनुदान हे 15 सप्टेंबरपासून वाटप होणार असल्याची माहिती मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
याअंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपयांची रक्कम 15 सप्टेंबरपासून जमा होणार आहे व यासाठी 2017-2020 या कालावधीमध्ये कर्जाची नियमित परतफेड करणारे शेतकरी पात्र ठरणार आहेत. तसेच या संबंधीच्या नवीन शेतकऱ्यांच्या याद्या 1 सप्टेंबर ते पाच सप्टेंबरच्या दरम्यान बनवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ही गोष्ट आहे महत्वाची
परंतु तुम्हाला जर या या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी यांचे आधार कार्ड स्वतःच्या बँक खात्याला लिंक करणे खूप गरजेचे आहे जर हे केले नसेल तर अनुदान मिळण्यासाठी अडचण निर्माण होत आहे व यासाठी शेतकऱ्यांना 30 ऑगस्ट 2022 पर्यंत अंतिम मुदत देण्यात येईल.
शेतकरी बंधूंना अनुदानासाठी लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्यात लिंक करणे गरजेचे आहे. तर तुमचे नाव लाभार्थी यादी मध्ये येईल. त्यामुळे शेतकरी बंधुंनी लवकरात लवकर लिंकिंग करण्याची प्रक्रिया करून घेणे गरजेचे आहे.
Published on: 26 August 2022, 11:06 IST