Government Schemes

सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. यावर्षी सोयाबीन पिकावर गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. आता याबाबत देखील राज्य सरकारने (state government) शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

Updated on 28 August, 2022 2:42 PM IST

सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. यावर्षी सोयाबीन पिकावर गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला त्यामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे. आता याबाबत देखील राज्य सरकारने (state government) शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे (farmers crops) पंचनामे करुन मदतीसाठी प्रस्ताव पाठवा असा आदेश राज्य सरकारने दिले आहेत. गोगलगायींमुळे सर्वाधिक नुकसान बीड, लातूर आणि उस्मानाबाद या भागात झाले होते.

Agriculture Scheme: कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना करावे लागणार 'हे' एक काम

या जिल्ह्यासह बाकीच्या काही भागातील 1 लाख 63 हजार 889 हेक्टर क्षेत्र गोगलगायीनं (snail) बाधित झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल शासनास दिले जाणार आहेत.

Onion Prices Increased: कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; कांद्याच्या दरात वाढ

ज्या शेतकऱ्यांचे नुकसान 33 टक्क्यांपेक्षा अधिक आहे अशा शेतकऱ्यांना मदतीसाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त व संबंधित जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहेत. गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 75 हजार रुपये थेट मदत देण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या 
Agriculture Minister: कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा; राज्यात राबविण्यात येणार 'एक दिवस बळीराजासाठी' ही संकल्पना
सरकारच्या सार्वजनिक भविष्य निर्वाह योजनेत जमा करा 500 रुपये आणि मिळवा 40 लाख रुपयांचा लाभ
Post Office: इंडिया पोस्ट ऑफिस उघडणार नवीन 10 हजार ऑफिस; लोकांना होणार फायदा
Incentive Grant: आनंदाची बातमी! शेतकऱ्यांच्या खात्यात 10 सप्टेंबरपर्यंत जमा होणार 50 हजार रुपये

English Summary: 75 thousand rupees farmers suffered damage snails
Published on: 28 August 2022, 02:07 IST