ट्रॅक्टर आणि शेती एकमेकाशी निगडित असलेले एक समीकरण असून आधुनिक शेतीमध्ये ट्रॅक्टर चा उपयोग फार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. शेतीच्या मशागतीची कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जातात. फळबागांमध्ये देखील ट्रॅक्टर अतिशय उपयुक्त असून इतर शेती आवश्यक उपकरणे चालवण्यासाठी देखील ट्रॅक्टर ची आवश्यकता भासते. त्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या दारापुढे ट्रॅक्टर उभे असलेले पाहायला मिळते. जर आपण एकंदरीत बाजारपेठेचा विचार केला तर ट्रॅक्टर मार्केटमध्ये विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर आहेत व त्यांची वैशिष्ट्ये आणि किंमत देखील कंपनीनिहाय वेगवेगळे आहेत.
या पार्श्वभूमीवर जर आपण कमी किमतीत चांगले वैशिष्ट्ये आणि मायलेज देणार्या ट्रॅक्टरचा विचार करत असाल तर या लेखामध्ये दिलेली माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकते. या लेखामध्ये आपण स्वराज कंपनीच्या अशाच एका महत्त्वपूर्ण आणि चांगली वैशिष्ट्य असलेल्या ट्रॅक्टरबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
स्वराज कंपनीचा 'स्वराज 735 XT' ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
आपल्याला स्वराज ट्रॅक्टर कंपनी माहित असून ही एक शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ट्रॅक्टर कंपनी असून या कंपनीने ट्रॅक्टरचे अनेक मॉडेल विकसित केली आहेत.त्यातल्या त्यात स्वराज कंपनीचा स्वराज 735 एक्सटी हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय ठरणार असून या ट्रॅक्टरची 38 एचपी क्षमता आहे आणि शेतीसाठी फार शक्तिशाली आणि मजबूत असा हा ट्रॅक्टर आहे.
हा ट्रॅक्टर 2734 सीसी आणि 38 एचपीच्या शक्तिशाली इंजिन सोबत येतो. या ट्रॅक्टरला 1800 इंजिन रेटेड RPM ची शक्ती देण्यात आली असून त्यामुळे तो एक प्रभावशाली आणि दमदार ट्रॅक्टर बनतो. या ट्रॅक्टर मध्ये वॉटर कुलींगसाठी 3 स्टेज ऑइल बाथ प्रकार आणि थंड करण्यासाठी एअर फिल्टर देण्यात आले
असून हे ट्रॅक्टर शेतीच्या कामामध्ये जास्त कालावधीपर्यंत अगदी सहजतेने काम करू शकते. या ट्रॅक्टरमध्ये 32.6 पीटीओ एचपी आहे आणि या ट्रॅक्टर मध्ये सिंगल आणि डुएल क्लच असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहे.
शेतकरी बंधू त्यांच्या गरजेनुसार त्याचा वापर करू शकतात. त्यासोबतच या ट्रॅक्टरमध्ये आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गिअर बॉक्स आहेत. या ट्रॅक्टरची बॅटरी क्षमता 12V 88AH क्षमतेसह येते. या ट्रॅक्टरचा कमाल वेग 28.5 किमी प्रतितास आणि मागील बाजूस 10.50 किमी प्रतितास आहे. तसेच यामध्ये मॅन्युअल आणि पावर स्टेरिंग असे दोन्ही प्रकार देण्यात असून या ट्रॅक्टर मध्ये ऑईल इमरस्ड ब्रेक आहेत, ज्यामुळे हा कमी निसरडा आणि मजबूत पकडीसाठी सक्षम आहे.
या ट्रॅक्टरची फ्युएल टॅंक कॅपॅसिटी 60 लिटरचे असून व्हील ड्राईव्ह 2WD आहे. महत्त्वाचे म्हणजे स्वराज कंपनीने या ट्रॅक्टरला दोन हजार तास किंवा दोन वर्षासाठीची वारंटी देखील उपलब्ध करून दिले आहे.या ट्रॅक्टरचे हायड्रोलिक क्षमता 1200 किलोग्राम आहे.
या ट्रॅक्टरची किंमत
भारतीय बाजारपेठेमध्ये स्वराज्य 735 एक्सटी या ट्रॅक्टरची किंमत सुमारे पाच लाख 80 हजार ते सहा लाख तीस हजार रुपयांदरम्यान आहे.
नक्की वाचा:कीटकनाशकांच्या सुरक्षित आणि जबाबदार वापरासाठी ड्रोन फवारणी SOP तंत्रज्ञान
Published on: 21 October 2022, 04:28 IST