Education

बरेच विद्यार्थी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि तत्सम परीक्षांची तयारी करत असतात. परंतु बऱ्याच दिवसांपासून स्पर्धापरीक्षा असो की विविध राज्य सरकारच्या विभागांतर्गत असलेल्या परीक्षा या पूर्णपणे बंद होत्या. परंतु परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून ती म्हणजे राज्यात सुमारे दीड लाख शासकीय व निमशासकीय पदे रिकामी असून या रिक्त पदांपैकी 75 हजार पदे येणाऱ्या वर्षभरात भरले जातील अशी घोषणा राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

Updated on 26 August, 2022 12:25 PM IST

बरेच विद्यार्थी विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा आणि तत्सम परीक्षांची तयारी करत असतात. परंतु बऱ्याच दिवसांपासून स्पर्धापरीक्षा असो की विविध राज्य सरकारच्या विभागांतर्गत असलेल्या परीक्षा या पूर्णपणे बंद होत्या.

परंतु परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून ती म्हणजे राज्यात सुमारे दीड लाख शासकीय व निमशासकीय पदे रिकामी असून या रिक्त पदांपैकी 75 हजार पदे येणाऱ्या वर्षभरात भरले जातील अशी घोषणा राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

नक्की वाचा:योजना विद्यार्थ्यांसाठी! अकरावी ते बारावी तसेच डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना सरकार देणार 51 हजार रुपये,वाचा माहिती

यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जो काही आकृती बंध असतो त्यानुसार शंभर टक्के शासकीय पदे भरली जाणार असून जिल्हा निवड समितीमार्फत भरण्यात येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील देखील 50 टक्के पदे या माध्यमातून भरले जाणार आहेत.

शासनाच्या आणि निमशासकीय संस्थांमधील लाखो रिक्त पदांची भरती रखडल्याने जनतेला सेवा देण्यावर आणि जनतेच्या कामांवर परिणाम होत असल्याचा मुद्दा अरुण लाड यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून विधान परिषदेत मांडला होता व याला उत्तर देताना शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली.

नक्की वाचा:Mpsc Recruitment: सुवर्णसंधी! एमपीएससीमार्फत 961 जागांसाठी मोठी भरती,वाचा सविस्तर माहिती

एवढेच नाही तर जिल्हा निवड समितीमार्फत भरण्यात येणारी 50% रिक्त पदे भरण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

 सात हजार पोलिसांची भरती

राज्यामध्ये पोलिसांच्या रिक्त जागा पैकी सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देखील देण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यावेळी त्यांनी सांगितले की या अगोदर सात हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नक्की वाचा:Job: सुवर्णसंधी! 10 वी पास उमेदवारांना संरक्षण क्षेत्रातील 'या'भरतीत मिळणार साठ हजार रुपये प्रतिमहा पगार, वाचा माहिती

English Summary: state goverment announce to recruitment in various 75 thousand post in state
Published on: 26 August 2022, 12:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)