Education

सध्याच्या काळात लहान मुलं खूपच हुशार आहेत. सगळ्या गोष्टी त्यांना पटकन समजतात. याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल आहे. मात्र याचे दुष्परिणाम देखील आहेत. यामुळे आरोग्य धोक्यात येत आहे. यामुळे मुलांना मोबाईल पासून लांब ठेवणे अनेकजण पसंत करत आहेत.

Updated on 15 November, 2022 4:36 PM IST

सध्याच्या काळात लहान मुलं खूपच हुशार आहेत. सगळ्या गोष्टी त्यांना पटकन समजतात. याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे मोबाईल आहे. मात्र याचे दुष्परिणाम देखील आहेत. यामुळे आरोग्य धोक्यात येत आहे. यामुळे मुलांना मोबाईल पासून लांब ठेवणे अनेकजण पसंत करत आहेत.

यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बांशी ग्रामसभेने असाच एक वेगळा प्रयोग केला आहे. नवीन पिढी मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे त्याचे परिणाम रोखण्यासाठी बांशी ग्रामसभेत अठरा वर्षाखालील मुला-मुलींना मोबाईल वापरण्याची बंदी घातली आहे.

यामुळे याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. बांशी गावात ११ नोव्हेंबर रोजी ग्रामसभा पार पडली. या ग्रामसभेत काही महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये १८ वर्षाखालील मुलांना मोबाईल (Mobile) बंदी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. यामुळे याचे चांगले परिणाम येणाऱ्या काळात दिसणार आहेत.

शेतकऱ्यांनो शेळीपालन व्यवसायात दूध उत्पादन करून कमवा लाखो रुपये, वाचा सविस्तर..

बांशीने मोबाईल बंदीचा आगळावेगळा निर्णय घेऊन तरुणाईला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, मुलांना मोबाईलमुळे गेम्स, वाईट साईट पाहण्याचे व्यसन लागले आहे. यामुळे ग्रामसभेने अठरा वर्षाखालील मुलांसाठी मोबाईल वापरावरिल बंदीचा निर्णय घेतला.

शेतकऱ्यांची वीज पुन्हा तोडण्यास सुरुवात, पिके लागली जळू

या ठरावाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले आहे. या गावचे सरपंच गजानन टाले आहेत. कोरोनाच्या काळात ऑनलाइन शिक्षणासाठी किशोरवयीन मुलांच्या हाती मोबाईल आले खरे, मात्र त्याचा फायदा होण्याऐवजी बरेचदा वाईट परिणाम दिसून आले. 

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी आता मिळणार 4 लाख, अनुदानात मोठी वाढ
पॉलिहाऊस, शेडनेटच्या नादी लागले आणि आज घरदार विकायची वेळ आली, अनेकांच्या आत्महत्या
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! आता शेतकऱ्यांना कमी किमतीत मिळणार खत

English Summary: Mobile ban children under 18 years! Gram Panchayat decision.
Published on: 15 November 2022, 04:36 IST