Education

सध्या नोकरी मिळणे फार दुरापास्त झाले आहे हे आपल्याला माहिती आहे. जर आपण दरवर्षी विविध कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर निघनाऱ्या तरुणांच्या संख्येचा विचार केला तर त्यामानाने उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्याचे प्रमाण हे अगदी नगण्य आहे. त्यामुळे तरुणांवर अक्षरशः नोकरीसाठी वणवण भटकण्याची पाळी येत आहे. आपल्याला माहित आहेच की, एखाद्या नोकरीची जाहिरात निघाली तर रिक्त पदांच्या संख्येपेक्षा काही अधिक पटीने अर्ज सादर केले जातात व यावरून या परिस्थितीची समस्या किती ज्वलंत आहे हे दिसून येते.

Updated on 23 September, 2022 10:04 AM IST

सध्या नोकरी मिळणे फार दुरापास्त झाले आहे हे आपल्याला माहिती आहे. जर आपण दरवर्षी विविध कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर निघनाऱ्या तरुणांच्या संख्येचा विचार केला तर त्यामानाने उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्याचे प्रमाण हे अगदी नगण्य आहे. त्यामुळे तरुणांवर अक्षरशः नोकरीसाठी वणवण भटकण्याची पाळी येत आहे. आपल्याला माहित आहेच की, एखाद्या नोकरीची जाहिरात निघाली तर रिक्त पदांच्या संख्येपेक्षा काही अधिक पटीने अर्ज सादर केले जातात व यावरून या परिस्थितीची समस्या किती ज्वलंत आहे हे दिसून येते.

या सगळ्या बिकट परिस्थितीत राज्य शासनाने एक महत्त्वाची योजना सुरु केली असून आता कोणत्याही शाखेतून बारावी पास असलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून नोकरी व पुढील शिक्षणाची हमी मिळू शकणार आहे.

नक्की वाचा:Naukari News:चालून आली आहे हवामान खात्यात नोकरी करण्याची संधी,वाचा सविस्तर माहिती

राज्य सरकारची योजना

 राज्य शासन ही योजना टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या माध्यमातून राबवित असून या वर्षात किमान या माध्यमातून 15 हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचा आधारावर  नोकरी तर मिळेलच परंतु ही नोकरी करीत असताना त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामधील शिक्षण घेण्याची देखील संधी मिळणार आहे

व एवढेच नाही तर टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून संबंधित विषयातील पदविका व पदवी प्रमाणपत्र देखील विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेसोबत 'मिलाप' या योजनेचा सामंजस्य करार करण्यात आला.

नक्की वाचा:तरुणांसाठी योजना! केंद्र सरकारची'ही' स्पेशल योजना मदत करते बेरोजगार तरुणांना,वाचा या योजनेविषयी सविस्तर

 या पूर्वी राज्याच्या समग्र शिक्षा कार्यालयाने मिलाप या कार्यक्रमाद्वारे बारावीत गणित विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी  एकाच वेळी त्यांना उच्च शिक्षण व नोकरीची संधी उपलब्ध व्हावी यासाठी एचसीएल कंपनीसोबत एक सामंजस्य करार देखील करण्यात आला असून यासाठी आतापर्यंत जवळजवळ 34 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे

व या योजनेअंतर्गत चालू वर्षात 25 हजार विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. परंतु मिलाप या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील मात्र विज्ञान शाखाच नाहीतर कला आणि वाणिज्य अशा कोणत्याही शाखेच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शिक्षण व नोकरीची हमी दिली जाणार आहे.

कोणत्या अभ्यासक्रमांचे मिळेल शिक्षण?

 या योजनेमध्ये विद्यार्थ्यांना ऑटोमोटिव्ह, चाईल्ड केअर, इलेक्ट्रॉनिक्स, इंटरटेनमेंट तसेच लाइफ सायन्स, रिटेल मॅनेजमेंट, टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी, आयटी इत्यादी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेता येणार आहे व या माध्यमातून नोकरीच्या संधी देखील मिळणार आहे.

नक्की वाचा:Job: शेतकरी पुत्रांनो! स्टाफ सिलेक्शनमध्ये आहे तब्बल 20 हजार पदांसाठी मोठी भरती, वाचा संबंधित माहिती

English Summary: milaaf scheme give gurantee to job and next higher education to 12th passed student
Published on: 23 September 2022, 10:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)