Education

वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा व स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी आणि उमेदवारांसाठी महाज्योतीने आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेतला असून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी या माध्यमातून विविध उपक्रम राबवणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. नुकतीच मंत्रालय येथे महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक झाली.

Updated on 28 September, 2022 4:07 PM IST

वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा व स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी आणि उमेदवारांसाठी महाज्योतीने आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेतला असून ओबीसी विद्यार्थ्यांसाठी या माध्यमातून विविध उपक्रम राबवणार असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. नुकतीच मंत्रालय येथे महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक झाली.

नक्की वाचा:कृषी अभियांत्रिकी करून मिळवा सरकारी नोकरी; महिना 50 ते 70 हजार रुपये मिळतो पगार

याबद्दल माहिती देताना मंत्री अतुल सावे यांनी म्हटले की, पीएचडी करणाऱ्या उमेदवारांना अवार्ड दिनांकापासून पहिल्या दोन वर्षासाठी रुपये 21000 तसेच घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च तर पुढील तीन वर्षासाठी रुपये पस्तीस हजार आणि घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च देण्याच्या प्रस्तावास देखील मान्यता देण्यात आली.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एम.फिल. उमेदवारांना एम.फिल ते पीएचडी असे एकत्रित देण्याबाबत बार्टी, पुणेच्या तज्ञ समितीने दिलेल्या शिफारसीनुसार कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नक्की वाचा:Upcoming Oppurtunity: 'एअर कॉलिटी मॅनेजमेंट'क्षेत्र येणाऱ्या 3 ते 5 वर्षात देईल भरपूर संधी, वाचा सविस्तर

राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि जे उमेदवार मुलाखतीस पात्र आहेत अशा उमेदवारांना रुपये पंचवीस हजार रुपये  एक वेळ अर्थसाह्य देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे व्यावसायिक अर्थात कमर्शियल पायलट ट्रेनिंग साठी निवड झालेल्या उमेदवारांना रुपये दहा हजार प्रतीमहा विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे देखील अतुल सावे यांनी सांगितले.

नक्की वाचा:Job: सुवर्णसंधी! स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये पाच हजारांहून अधिक जागांसाठी मोठी भरती, वाचा माहिती

English Summary: mahajyoti give financial support to other backward class student
Published on: 28 September 2022, 04:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)