पुणे कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात ५० वर्षांपूर्वी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांची गट्टी जमलेली पहायला मिळाली. निमित्त होते, ते १९७२ साली पदवीप्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे. ५० वर्षांपूवीची विद्यार्थी दशा आणि आत्ताची जेष्ठता याची सांगड घालत आठवणींना उजाळा देत हा स्नेहमेळावा संपन्न झाला. वयाच्या सत्तरीत असलेले हे विध्यार्थी एकमेकांचं परिचय देत सुरु असलेल्या कार्याची ओळख एकमेकांना करून देत होते.
हा सुवर्ण स्नेह मेळावा शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयाच्या प्रांगणात झाल्याने सर्वच भावूक झाले. तर याच ठिकाणी मेळावा संपन्न व्हावा अशी अनेकांची इच्छा असल्याने महाविद्यालयाच्या आवारात त्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या उर्वरित आयुष्य जगण्याला आणखी उमेद मिळाली असल्याचे सांगत नियमित अशा स्नेह मेळाव्याचे आयोजन केले जाण्याची इच्छा व्यक्त केली गेली. शिवाय यापुढील मेळावे पुण्यासह विविध ठिकाणी आयोजित केले जावे अशी संकल्पना मांडण्यात आली.
एकूण ५० कृषी पदवीप्राप्त विद्यार्थी उपस्थित असलेल्या मेळाव्यातील जेष्ठ विद्यार्थी उल्हास बाप्ते यांचा ७५ वर्ष पूर्ण केल्याबद्दल सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. मुंबई येथे झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वसंत जाधव यांचा राज्यपालांकडून त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा सन्मान झाला असल्याने त्यांचे यावेळी कौतुक करण्यात आले. तर मेळाव्यात डॉ. व्यवहारे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
मच्छिंद्र शिंदे यांचे चिरंजीव डॉ. अभिजित शिंदे यांनी मधुमेह रोग नियंत्रण यावर मार्गदर्शन केले. तर कृषी विद्यार्थी बी. बी. जाधव यांचा मंगळवेढा येथे स्वतःचा जकराया साखर कारखाना असून हा खासगी कारखाना त्यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी स्थापन करून उत्तम प्रकारे चालवत असल्याने मेळाव्यात त्यांच्या कारखान्याची यशोगाथा सर्वांसमोर ठेवण्यात आली. यावेळी कृषी पदवीधर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या;
.. तर ऊस उत्पादकांना आत्महत्या करण्याची वेळ येईल! नितीन गडकरींचे मोठे वक्तव्य
कृषी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थेत शेतीमध्ये क्रांती, मुलांनी फुलवली शेती..
शरद पवार ऊस उत्पादकांना डोळ्यासमोर न ठेवता त्यावर प्रक्रिया करणाऱ्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात
Published on: 26 April 2022, 02:40 IST