Automobile

मारुती सुझुकी ही कार निर्मिती क्षेत्रातही भारतातील अग्रगण्य कंपनी असो या कंपनीने अनेक नवनवीन कारचे व्हेरिएंट बाजारात आणले आहे. त्यापैकीच मारुती सुझुकीने भारतात s-presso चे नवीन सीएनजी मॉडेल लॉन्च केले आहे.S CNG मॉडेल हे LXi आणि Vxi या दोन प्रकारात उपलब्ध आहे. या कारचे काय वैशिष्ट्य आहेत हे आपण पाहू.

Updated on 16 October, 2022 6:51 PM IST

मारुती सुझुकी ही कार निर्मिती क्षेत्रातही भारतातील अग्रगण्य कंपनी असो या कंपनीने अनेक नवनवीन कारचे व्हेरिएंट बाजारात आणले आहे. त्यापैकीच मारुती सुझुकीने भारतात s-presso चे नवीन सीएनजी मॉडेल लॉन्च केले आहे.S CNG मॉडेल हे LXi आणि Vxi या दोन प्रकारात उपलब्ध आहे. या कारचे काय वैशिष्ट्य आहेत हे आपण पाहू.

नक्की वाचा:Car News: 'ड्राईव्ह इन 2022, पे 2023' नेमकी काय आहे होंडा कारची ही योजना? वाचा या योजनेविषयी डिटेल्स

 s-presso चे पेट्रोल आणि सीएनजी व्हेरिएंट मधील फरक

 जर आपण s-presso च्या  किमतीचा विचार केला तर या कारचे पेट्रोल व्हेरिएंट चार लाख 95 हजार रुपयाला असून एस प्रेसो सीएनजी व्हेरिएंटपेक्षा 95 हजार रुपये स्वस्त आहे.

मारुती सुझुकीच्या s-presso सीएनजी मोडेल रेनॉल्ट क्विड आणि मारुती सुझुकी अल्टो के 10 गाड्यांना टक्कर देऊ शकते असे मानले जात आहे.ही सीएनजी कार 32.73 Kmpl चे मायलेज देईल. यामध्ये 1.0 लिटर डुएल जेट, डुएल VVT पेट्रोल इंजिन मिळेल. या कारचे इंजिन 82.1Nm टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.

नक्की वाचा:TVS ने केली नवीन क्लासिक स्कुटर लाँच, हे आहेत खास फीचर्स तर एवढी असेल किंमत

मारुती सुझुकी कंपनीने याआधी नऊ सीएनजी कारचे मॉडेल सादर केले आहे. एसप्रेसो हे नवीन मॉडेल कंपनीचे दहावी सीएनजी मॉडेल आहे. यामध्ये डुएल इंटरडिपेंडंट इलेक्ट्रिक कंट्रोल युनिट, इंटेलिजंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीम, स्टेनलेस स्टील पाईप आणि सीएनजीसाठी विकसित इंटिग्रेटेड वायरिंग हार्नेस सिस्टीम सोबत जॉइंट्स मिळतील.

S-CNG मायक्रो स्विच देण्यात आला असून यामुळे इंजिन चालू आणि बंद करता येईल.

 किती आहे या कारची किंमत?

 एसप्रेसो कारची सुरुवातीची किंमत पाच लाख 90 हजार रुपये असून यातील Vxi प्रकारा ची किंमत सहा लाख दहा हजार रुपये आहे.

नक्की वाचा:Bike Update: अरे वा! जावाची दमदार एन्ट्री; बाजारपेठेमध्ये सादर केली 'ही'बाईक,वाचा किंमत

English Summary: maruti suzuki s presso cng car launch with many attractive feature and affordable price
Published on: 16 October 2022, 06:51 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)