Automobile

सध्या पेट्रोल डिझेलचे (Petrol Diesel) वाढते भाव सर्वसामान्य लोकांना परवडेना झालेत. त्यामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric vehicle) वळत असताना पाहायला मिळत आहेत. लोकांचा कल लक्षात घेता कंपन्यांनी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

Updated on 31 August, 2022 3:46 PM IST

सध्या पेट्रोल डिझेलचे (Petrol Diesel) वाढते भाव सर्वसामान्य लोकांना परवडेना झालेत. त्यामुळे अनेक लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric vehicle) वळत असताना पाहायला मिळत आहेत. लोकांचा कल लक्षात घेता कंपन्यांनी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे.

Tata Motors, Mahindra, MG Motors, Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी त्यांची उत्पादने लाँच केली आहेत. आजकाल ऑटो मार्केटमध्ये एकापेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहने लॉन्च होत आहेत, ज्यामुळे लोकांचा वेग देखील याकडे आहेत.

जर तुम्हाला कमी किंमतीत खास इलेक्ट्रिक बाईक (Electric bike) घरी आणायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरत आहे. आजकाल ऑटो मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार, स्कूटर किंवा बाईकची मागणी खूप जास्त आहे.

शेतकऱ्यांनो सावधान! उसावरील विषारी अळी जीवाला पोहचवतेय हानी

अशा परिस्थितीत प्रत्येकाला स्वतःसाठी एखादी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करायची असते, जेणेकरून पेट्रोलच्या महागड्या खर्चातून दिलासा मिळू शकेल. विशेष महानजे ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving license) किंवा रजिस्ट्रेशन असण्याची गरज नाही.

शेतकरी मित्रांनो आता घराच्या छतावरच तयार करा वीज; सरकार देतंय 50 हजारांपर्यंत अनुदान

इव्होलेट पोनी इलेक्ट्रिक स्कूटरची वैशिष्ट्ये

इव्होलेट पोनी ही स्कूटर भारतातील सर्वात स्वस्त स्कूटरपैकी एक आहे. लोकांनाही ही स्कूटर खूप आवडते. इव्होलेट पोनी 48V/28Ah VRLA बॅटरीसह येते, तर पोनी क्लासिक 48V/25Ah लिथियम-आयन बॅटरीसह येते.

इव्होलेट पोनीमध्ये वॉटरप्रूफ बीएलडीसी मोटरने सुसज्ज असण्यासोबतच, कंपनी 250 वॅट्स पॉवर देखील निर्माण करते. इव्होलेट पोनी एका चार्जवर सुमारे 90-120 किमीची रेंज देते.

ही इव्होलेट पोनी मोटर बाईक दोन प्रकारात उपलब्ध आहे. यापैकी एक लीड ऍसिड बॅटरी, जी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 8-9 तास घेते. तसेच दुसरी आहे ती बाईक लिथियम-आयन बॅटरी, ही बाईक पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 3-4 तास लागतात.

किंमत आणि रंग पर्याय

Evolet Pony EZ ची सुरुवातीची किंमत 39,542 रुपये आहे, तर क्लासिक प्रकाराची सुरुवातीची किंमत 49,592 रुपये आहे. हे इलेक्ट्रिक पर्याय म्हणून अनेक IoT वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहे. कलर ऑप्शन्सबद्दल (Color options) बोलायचे झाले तर ही स्कूटर पांढऱ्या, काळा, लाल, निळ्या आणि सिल्व्हर कलरमध्ये उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या 
एलआयसीची 'ही' योजना ठरतेय अत्यंत फायदेशीर; फक्त 29 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळतात 4 लाख रुपये
शेतकरी मित्रांनो वेस्ट डीकंपोजरने तुमचे उत्पन्न वाढणार; फक्त 'या' पद्धतींचा करा वापर
जनावरांमधील कासदाह आजारामुळे दूध उत्पादनात होतेय घट; करा घरीच 'या' उपाययोजना

English Summary: electric scooter bought only 40 thousand
Published on: 31 August 2022, 03:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)